जिल्हा परिषद शाळा नगरदेवळा येथे सरहदो के मुहाफिज कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा परिषद शाळा नगरदेवळा येथे सरहदो के मुहाफिज कार्यक्रमाचे आयोजन

 

 

 

पाचोरा: जिल्हा परिषद उर्दू शाळा नगरदेवळा येथे याच शाळेचे माजी विद्यार्थी आणि सध्या भारतीय सैन्यात सेवा बजावणारे वसीम ताज खान (भारतीय सैन्य) व अरबाज शेख लतीफ (सशस्त्र सीमा बल – SSB) यांचा सरहदीचे रक्षक (सरहदो के मुहा फज) शीर्षकाखाली एका सत्कार व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठण आणि नात-ए-पाकने झाली.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गरीब नवाज फाउंडेशनचे अध्यक्ष शेख अफरोज रहीम होते. दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. वसीम ताज खान यांनी सांगितले की, “माणसाची किंमत ही शिक्षणानेच होते, अशिक्षित माणूस समाजावर ओझे मानला जातो.” त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी आवाहन केले.

 

अरबाज शेख लतीफ यांनी आपल्या जीवनातील चढ-उतार, तसेच भूदल, नौदल, वायुदल आणि NDA परीक्षेबाबत सविस्तर माहिती दिली. शाळेतील आनंदी शैक्षणिक वातावरण आणि दर्जेदार शिक्षणासाठी त्यांनी शिक्षकांचे विशेष कौतुक केले. सुट्टीवर आलेले असतानाही या सैनिकांनी शाळेसाठी वेळ काढून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल शेख अफरोज रहीम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांचे आभार मानले.

 

या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सय्यद इमरान अली, मुश्ताक ताज खान, नासिर मणियार, लतीफ शेख, अब्दुल करीम शेख, सोहेल शेख उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अजहर शेख, जावेद रहीम, शेख रिजवान, दिलारा सय्यद, सना अंसारी आणि नवीदा अंसारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी केले, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.