सोयगाव येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोयगाव येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 

 

सोयगाव | प्रतिनिधी दत्तात्रय काटोले सोयगाव येथे ३७५ रुग्णांनी घेतला लाभ

लायन्स नेत्र रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर व भारतीय जनता पार्टी, सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ३७५ रुग्णांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला, ही बाब उल्लेखनीय ठरली.

शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल नेत्र तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना माफक दरात चष्म्यांचे वाटप करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमास अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष ईद्रीसजी मुलतानी, महिला मोर्चा अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सौ. पुष्पाताई काळे, जयप्रकाश चव्हाण, माजी नगराध्यक्ष कैलासदादा काळे, वसंत बनकर, नगरसेवक राजेंद्र जावळे, जिल्हा चिटणीस सुनील गावंडे, तालुका अध्यक्ष संजय पाटील, शहराध्यक्ष मंगेश सोहनी, खरेदी-विक्री संघ संचालक मयूर मनगटे,भय्या परदेशी, जिल्हा सरचिटणीस विशाल गिरी, प्रमोद पाटील, सुनील ठोंबरे, भैय्या देसले, राहुल राठोड, राजेंद्र म्हसके, सुरज कवाळ, राजू रेकनोद, बद्री राठोड, संजय चौधरी व संजय आगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. गरजू रुग्णांना मोफत व सुलभ सेवा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल लायन्स नेत्र रुग्णालय तसेच भारतीय जनता पार्टी, सोयगावच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात आले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप सोयगाव शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. जनहिताच्या कार्यातून ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या भाजपच्या ध्येयधोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

फोटो. दत्तात्रय काटोले