गदेवाडीच्या मयत कृष्णा धनवाडेचा नातेवाईकच निघाला मारेकरी,पैठणच्या पाटेगाव पुलाखाली गंगेच्या नदीपात्रात पोत्यात बांधून टाकला होता मृतदेह, पोलीसांनी दोनच दिवसात आरोपी केला गजाआड 

गदेवाडीच्या मयत कृष्णा धनवाडेचा नातेवाईकच निघाला मारेकरी,पैठणच्या पाटेगाव पुलाखाली गंगेच्या नदीपात्रात पोत्यात बांधून टाकला होता मृतदेह, पोलीसांनी दोनच दिवसात आरोपी केला गजाआड

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण जवळील पाटेगाव पुलाखाली गंगेच्या नदीपात्रात शेवगाव तालुक्यातील गदेवाडीच्या कृष्णा धनवाडे याचा मृतदेह सोमवारी १५ डीसेंबर रोजी सकाळी आढळून आला होता. त्याच्या अंगामध्ये काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते.आणि काळ्या रंगाची पॅन्ट होती.उजव्या कानात सोनेरी रंगाची बाळीही होती.गळ्यात काळे मणी असलेली मॅग्नेट ची माळही होती. सदर प्रेत हे पैठण पोलिस स्टेशनच्या हद्दीत पाटेगाव येथील पुलाखाली गंगेच्या नदीपात्रात पोलीसांना आढळून आले होते.कृष्णा पंढरीनाथ धनवाडे चा मृतदेह मिळून आल्याने पंचक्रोशीत सर्वत्र खळबळ उडाली होती.सदरचे वर्णन असलेली व्यक्ती कोणाच्याही ओळखीची असेल तर संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या ग्रामीण पोलीस स्टेशनचे

पोलीस निरीक्षक महादेव गोमारे साहेब यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस खात्यातर्फे करण्यात आले होते. पैठण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली असता सदर मृतदेह हा हातपाय बांधून पोत्यात घालून टाकलेल्या अवस्थेत गंगेच्या नदीपात्रात दिसुन आला होता.त्यामुळे हा खुनाचाच प्रकार असल्याचे तेंव्हाच पोलिसांच्या लक्षात आले होते.संभाजीनगर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन सदर मृतदेह हा तातडीने उत्तरीय तपासणी साठी संभाजीनगर येथे पाठवून दिला होता. पोस्ट मार्टेम रिपोर्ट मधिल उत्तरीय तपासणीत गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सुरवातीलाच सदर व्यक्तीचा खून हा पुर्व वैमनस्यातून झाला असून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात घालून पैठण जवळील पाटेगाव पुलाखाली गंगेच्या नदीपात्रात टाकण्यात आला असा अंदाज पोलिसांना आलाच होता.त्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास हा छत्रपती संभाजी नगर स्थानिक गून्हे शाखेकडे (एल ही बी) देण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक सीपी पवार, उपनिरीक्षक प्रमोद यादव, सहायक फौजदार सुधिर ओहळ हवालदार नरेंद्र अंधारे,मुज्यू पठाण, भाऊसाहेब तांबे यांच्या पथकाने पैठण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणात तपासाच्या योग्य दिशेने लक्ष घालून मयत झालेल्या अनोळखी व्यक्तींच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी त्याचे फोटो अहिल्यानगर, नाशिक,बीड, जालना,संभाजी नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पोलिस स्टेशनला पाठवून दिले होते.पोलीस तपास करीत असताना जिल्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांना या मयत तरूणांची ओळख पटविण्यात यश आले होते. गदेवाडी परीसरात वास्तव्य असलेल्या एका माहीतगार व्यक्तीने या मयत झालेल्या अनोळखी तरुणाचे नाव “कृष्णा पंढरीनाथ धनवाडे “असे असुन तो अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील कायम रहिवासी असल्याचे पोलिसांना सांगितले होते.संभाजीनगर जिल्हा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसींग रजपूत,अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सींग यांच्या मार्गदर्शना खालील पोलिस पथकातील सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे, पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे,अशोक वाघ, संजय तांदळे, सचिन राठोड, सुनिल गोरे,बलवीरसींग बहुरे यांच्या पोलिस पथकाने थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गदेवाडी गाठून गावात जाऊन कृष्णा धनवाडे यांचे घर गाठले. आणि खूनाचा उलगडा करण्याच्या दिशेने तपास सुरू केला असता त्यांना अशी माहिती मिळाली होती की कृष्णा पंढरीनाथ धनवाडे यांचे आणि त्याचे भाचेजावई सागर रामेश्वर केसापुरे, राहणार, देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा यांच्याशी अजिबात पटत नव्हते.सागर केसापुरे यांनी अनेक वेळा तुझी कायमचीच वाट लावतो असे अनेक वेळा कृष्णा धनवाडे याला शिविगाळ करताना बोलूनही दाखवले होते. कृष्णा धनवाडे आणि सागर केसापुरे यांचे मामा आणि भाचेजावई असे नाते होते.त्यामुळे तपास करताना सागर रामेश्वर केसापुरे याच्यावरच पोलीसांचा जास्त संशय बळावला होता.कृष्णा धनवाडे हा मुकबधीर असल्याने त्याला ही माहिती कोणालाही सांगता आली नाही.भिंतीलाही कान असतात या म्हणी प्रमाणे कृष्णाला शिविगाळ करताना हे वाक्य ईतर लोकांनी लांबून ऐकले होते. पोलीसांनी आपला मोर्चा थेट सागर रामेश्वर केसापुरे याच्याकडे वळवून त्याला ताब्यात घेतले.असता त्याला कृष्णा पंढरीनाथ धनवाडे याच्या विषयी माहिती विचारली असता त्यानें प्रथम पोलीसांना उडवा उडवीची उत्तरे दिली.आणि आपण त्या गावचेच नाहीत असा पवित्रा घेतला होता.पण पोलीसांनी जागेवरच मुसक्या आवळून त्याला चौदावे रत्न दाखवताच त्याला पहील्या शब्दफेकीतच गार केले.मग तो सुतासारखा सरळ होउन पोपटाप्रमाणे बोलू लागला. कृष्णा धनवाडे आणि माझे नेहमीच खटके उडत होते.त्याचा राग मला नेहमीच अनावर होत होता.म्हणून मी माझे साथीदार ऋषिकेश सखाराम गायकवाड, राहणार दुधड, जिल्हा संभाजी नगर आणि एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने कृष्णा पंढरीनाथ धनवाडे याचा घरातच गळा दाबून खून केला आणि खुनाचे बालंट आपल्यावर येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे हातपाय बांधून त्याला एका पोत्यात घालून त्याचा मृतदेह थेट पैठण जवळील पाटेगाव पुलाखाली गंगा नदीच्या पात्रात टाकून दिल्याचे सांगितले.आरोपी कितीही धुर्त असला तरी त्याला निश्चितच जेरबंद करण्यात येईल अशी ग्वाही पोलिस पथकाने अगोदरच दिली होती. आणि त्या प्रमाणे पोलीसांनी कोणत्याही प्रकारचे धागेदोरे हाती नसतानाही दोनच दिवसात तपास लावला होता.”कानून के हाथ कितने लंबे होते है” हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलिसांनी सर्व सामान्य जनतेला दाखवून दिले आहे.पैठण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील हे नुकतेच पैठण येथे रूजू झाले आहेत.या पुर्वी ते अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे कार्यरत होते त्यामुळे त्यांना संपूर्ण शेवगाव तालुक्याची चांगलीच खडानखडा माहिती होती. त्यांनी तपासाच्या अगोदरच आरोपींना निश्चितच जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. कृष्णा धनवाडे याचा खून नेमका कोणत्या कारणाने झाला आहे हे आता पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.संभाजीनगर जिल्ह्यातील पोलिसांनी दोनच दिवसात तपास लावल्यामुळे त्यांचे अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार कौतुक होत आहे. आपल्या पुर्वजांनी असं लिहून ठेवलंय की खून हा कधीच पचत नसतो.त्याला कितीही वर्षे झाली तरी खूनाला वाचा फुटतेच हे त्रिवार सत्य आहे हे या घटनेनं पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे.