सोयगाव येथे होमगार्ड संघटनेचा ७९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
सोयगाव, दि. १५ (प्रतिनिधी – दत्तात्रय काटोले):
महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त सोयगाव येथील होमगार्ड पथक कार्यालयाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. रविवारी (दि. १४) सकाळी होमगार्ड कार्यालय परिसरात वृक्षरोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यानंतर सोयगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका समादेशक अधिकारी कडूबा बावस्कर व अंशकालीन लिपिक कृष्णा शेवाळकर यांनी होमगार्ड जवानांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास समाधान काळे, ऋषी काळे, राज महंमद शेख, अनंत लवटे, किरण सपकाळ, विलास भवर, दिनेश काळे, इमरान शेख, शांताराम मिसाळ, ज्ञानेश्वर काळे, विजय सोनवणे, संतोष घनगाव, भाग्यवान बनसोडे, विनोद इंगळे, हिरालाल ठाकरे, गजानन बागुल, श्रावण मंडवे, शिवाजी रोकडे, भिकन रोकडे, रवींद्र सरोदे, सुनील सोनवणे, गणेश शिनकर, विष्णू घनगाव यांच्यासह महिला होमगार्ड संगीता भालेराव, रुकसाना तडवी आदी उपस्थित होते.
तसेच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत घोडके, डॉ. निखात जहा, अधिपरिचारिका मंगला हिवर्डे, समुपदेशक सुनील वानखेडे, निर्मला जेठे, सुशीला रोकडे, ज्योती चणाल, कैलास पाटील, असलम पठाण, संजय झालवार यांचीही उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे सामाजिक जाणीव व सेवाभावाचा आदर्श निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
फोटो दत्तात्रय काटोले

























