श्री क्षेत्र मढी येथिल एकमुखी दत्त श्रीपाद वल्लभ देवस्थान मध्ये मोठ्या उत्साहात महायज्ञ सोहळा संपन्न 

श्री क्षेत्र मढी येथिल एकमुखी दत्त श्रीपाद वल्लभ देवस्थान मध्ये मोठ्या उत्साहात महायज्ञ सोहळा संपन्न

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथिल एकमुखी दत्त श्रीपाद वल्लभ देवस्थान मध्ये दत्तात्रय जन्मोत्सव आणि गुरू पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हा महायज्ञ सोहळा संपन्न झाला. एकमुखी दत्त देवस्थानचे अध्यक्ष गुरूवर्य पोपट महाराज आणि त्यांच्या राज्य भरातून आलेल्या भक्त गणांनी या सोहळ्यास हजेरी लावली होती. मढी येथे प्रसिद्ध असलेल्या एकमुखी दत्त मंदिरात दत्त जन्मोत्सवाचे औचित्य साधून या महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या महायज्ञ सोहळ्या मध्ये होम हवन, मंत्रोच्चार, महाआरती, करण्यात आली.आणि संपूर्ण राज्यभरातून आलेल्या भक्त गणासाठी महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते.राज्यभरातून आलेल्या भक्त गणांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्य पोपट महाराजांचे दर्शन घेऊन आशिर्वाद ही घेतले.महाराष्ट्रातून आलेल्या अनेक शिष्य गण भाविक भक्तांनी या मंदिरात मोठी गर्दी करीत महाराजांच्या हस्ते नवसाचे नारळ घेतले.या सोहळ्यासाठी डॉ जगन्नाथ मरकड, शिवाजी जाधव, अभिजित शिंदे, गणेश गडगे, संदिप पवार, शैलेश गायकवाड, महेश शिरसाठ, योगेश तिवारी,अजय चितळकर,दिपक थोरात,कुंडलीक ढोबळे,सचिन जाधव,नागेश पांचाळ,ऋषिकेश गुंजाळ,सुजित वदक,वैभव कानडे,महेश बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले. राज्यभरातून आलेल्या भक्त गणांच्या वाहनांच्या रस्त्यावर दुतर्फा रांगा लागल्या होत्या.कासार पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी ही दत्त जन्मोत्सवाचे औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते.दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमा साठी भानुदास शिंदे यांच्या परीवारानी ग्रामस्थांच्या मदतीने विशेष सहकार्य केले.महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.