रामजी नगर प्राथमिक शाळेत दशसूत्री अंतर्गत पालक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रामजी नगर प्राथमिक शाळेत दशसूत्री अंतर्गत पालक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 

दत्तात्रय काटोले

 

सोयगाव, दि. 25 नोव्हेंबर 2025 :

जिल्हाधिकारी मा. श्री. दिलीपजी स्वामी यांच्या प्रेरणेतून दशसूत्री कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रामजी नगर( काळे नगर) येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोयगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. आशाबाई तडवी यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गजाननभाऊ कुडके, सौ. वैशाली पवार आणि मनोज आगे उपस्थित होते.

 

सभेची सुरुवात मालेगाव येथील चिमुकलीच्या दुर्दैवी निधनानिमित्त सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.

 

मा. मुख्याध्यापक रघुनाथ काटोले सर यांनी शाळेत राबविण्यात येत असलेल्या दशसूत्री कार्यक्रमाची प्रगती सविस्तर अहवालाद्वारे मांडली. शाळेत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात असून पुढील काळातही अधिक जोमाने राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर उपस्थित पालक व मान्यवरांनी सकारात्मक चर्चा केली.

 

चर्चेअंती खालील निर्णय सर्वानुमते घेण्यात आले :

 

विद्यार्थ्यांसाठी 1,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी देण्यात येईल.

शाळेसाठी दोन संगणक उपलब्ध करून देण्याचा निर्णय.

शाळेच्या रंगरंगोटीकरिता आर्थिक सहाय्य देण्याचे ठरले.

यावेळी रघुनाथ काटोले सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दकोशांचे वाटप देखील करण्यात आले.

 

पालक विनोद सुरडकर, रघुनाथ इंगळे, मिलिंद निकम, गजानन कुडके, मंदाबाई इंगळे, भारती साळवे, सखुबाई सुरे, वैशाली पवार, पार्वताबाई जेठे, मनीषा जेठे, लताबाई गायकवाड, कलाबाई बावस्कर, सुनिताबाई जाधव, लक्ष्मी भरवाड, वसंताबाई भरवाड, संगीता खिल्लारे, मंगला छाडेकर, ज्योती कोतवाल, वंदनाबाई दांडगे, मीराबाई वावरे आदींची विशेष उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री. गोपाल चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षकवर्गातर्फे करण्यात आले. पालक सभा उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली.