राज्यस्तरीय खो–खो स्पर्धेसाठी रविवारी निवड चाचणी…!!!!!

राज्यस्तरीय खो–खो स्पर्धेसाठी रविवारी निवड चाचणी…!!!!!

 

जळगाव – ५१वी कुमार/मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी दिनांक १६/११/२०२५ वार रविवार रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल.

 

ठिकाण-जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे मैदान (व.वा.वाचनालय) जळगाव.

 

सूचना

 

या निवड चाचणीसाठी सहभाग घेणाऱ्या खेळाडूचा जन्म दिनांक ०५ जानेवारी २००८ रोजी अथवा त्यानंतर जन्मलेला असावा तसेच ग्रॅज्युएशनच्या प्रथम वर्ष पर्यंत शिकत असलेला खेळाडू निवड चाचणीसाठी पात्र राहील तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी आमदार चंद्रकांत सोनवणे , प्रा.डी. डी. बच्छाव , गणपतराव पोळ, उदय पाटील, एन.डी. सोनवणे, प्रा.श्रीकृष्ण बेलोरकर , सुनिल समदाणे , जयांशू पोळ, सौ.विद्या कलंत्री यांनी केले आहे.सर्व खेळाडूंनी खालील कागदपत्र सोबत आणावे.

 

१)जन्माचा मुळ (ओरिजनल)दाखला किंवा दहावी/बारावी बोर्ड सर्टिफिकेट २)ओरिजनल आधार कार्ड

३) शाळेचे आय कार्ड

४) पासपोर्ट साईज फोटो

५) वजन+ उची+वय=२५०

६)ईमेल आयडी

७)मोबाईल क्रमांक

 

अधिक माहितीसाठी संपर्क

 

1) राहुल पोळ – 9404292714

2) दत्तात्रय महाजन – 7020751823

3) विशाल पाटील – 9970308326

4) दिलीप चौधरी – 9158469294