“महेंद्र बेराड पारध गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक” – जनतेचा मोठा पाठिंबा; ऑनलाईन सर्वेक्षणात 74% लोकांचा पाठिंबा
पारध (ता. भोकरदन) —
भोकरदन तालुक्यातील पारध येथील शिक्षण क्षेत्रात कार्यरत आणि लोकप्रिय समाजसेवक श्री. महेंद्र बेराड यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पारध गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या नावावर स्थानिक राजकारणात आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
श्री. बेराड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, ग्रामीण विकास आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. साधा स्वभाव, जनसंपर्कातील पारदर्शकता आणि लोकाभिमुख दृष्टीकोन यामुळे ते सर्वसामान्य जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.
अलीकडेच घेण्यात आलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात “जिल्हा परिषद पारध बु सर्कल” या मतदारसंघात महेंद्र सर बेराड यांना तब्बल 74.51% लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. या निकालामुळे स्थानिक पातळीवर त्यांचे उमेदवारीसाठीचे स्थान आणखीनच मजबूत झाले आहे. तसेच या पोलमधील निकालामुळे प्रस्थापित विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
स्थानिक युवक वर्ग, शिक्षक आणि शेतकरी समुदाय बेराड सरांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यामुळे पारध गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांची दावेदारी अधिक बळकट होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

























