लोकसंघर्ष पक्षाकडून सौ. संगिता जाधव यांना उमेदवारी — पिशोर परिसरात उत्साहाचे वातावरण
पिशोर: (श्री महेंद्र बेराड,तालुका प्रतिनिधी)पिशोर जिल्हा परिषद गटातून सौ. संगीता गणेश जाधव यांना लोकसंघर्ष पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.पक्षाचे पक्षाध्यक्ष ऍड. योगेश माकणे सर यांनी ही घोषणा केली.
सौ.जाधव यांनी यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही लढवली असून त्यावेळी त्यांनी उल्लेखनीय मते मिळवली होती. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि जनतेतील विश्वासामुळे पक्षाने या निवडणुकीत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
त्यांचे पती गणेश जाधव हे देखील परिसरातील एक नामांकित समाजसेवक आहेत. शेतकरी, महिला, कामगार तसेच युवक यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध आंदोलने, निवेदने आणि सततचा पाठपुरावा केला आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान मिळवून देण्यासाठीही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्या कुटुंबावर विश्वासाचा ठसा उमटला आहे.
सौ. संगिता जाधव या महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास या प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारीची घोषणा होताच महिलांनी आणि युवकांनी उत्साहात फुलांच्या वर्षावात त्यांचे स्वागत केले.
📍 उमेदवार: सौ. संगिता गणेश जाधव
📍 गट: पिशोर, जिल्हा परिषद गट
📍 तालुका: कन्नड
📍 जिल्हा: छत्रपती संभाजीनगर
📍 पक्ष: लोक संघर्ष पक्ष
> 🗣 “जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवत राहिलो आहे. आता गावात विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा निर्धार केला आहे,” — सौ. संगिता गणेश जाधव
📞 संपर्क:9503203510