जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन; व प्रतिमेचे पूजन
सोयगाव, दि. ९ (प्रतिनिधी):
वीर शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शिवसेना पदाधिकारी आणि नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने भव्य प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शिवसेना तालुका अध्यक्ष भगवान भाऊ पंडीत यांच्या दुकानात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास दादा काळे, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप मचे, राजू दुतोंडे, वसंत बनकर, रोप कालू, दत्तात्रय काटोले, दत्तू रोकडे, दत्तू एलीस, देवा पंडीत, ह. भ. प. जितेंद्र महाराज पंडित, नितीन सोनवणे, भगवान वाघ, गोकुळ परदेशी, राहुल मानकर, विशाल सोनवणे, ललित पंडित, शंकर वाघ, संदीप सोहनी, पंकज परदेशी, रतन परदेशी, शिवसेना उपशहरप्रमुख दीपक बागुल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी वीर जिवाजी महाले यांच्या शौर्यगाथेचा गौरव करताना, नव्या पिढीने त्यांच्या त्याग व बलिदानाचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.