सोयगाव : रवळा येथील मोफत आरोग्य शिबिरात २०० रुग्णांची तपासणी ; ५० रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया

सोयगाव : रवळा येथील मोफत आरोग्य शिबिरात २०० रुग्णांची तपासणी ; ५० रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया

 

 

 

दत्तात्रय काटोले सोयगाव, दि. ९ (प्रतिनिधी) :

तालुक्यातील रवळा येथे भाजपा नेते सुरेश बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त ना. गिरीश महाजन फाउंडेशन व रुबी स्टार हॉस्पिटल, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवारी पार पडलेल्या या शिबिरात तब्बल २०० रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये ५० रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांच्यावर पुढील उपचार रुबी स्टार हॉस्पिटल, जामनेर येथे शासकीय योजनेंतर्गत केले जाणार आहेत.

शिबिरात गरजू रुग्णांची डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्मे व औषधे देण्यात आली. या उपक्रमात रुबी स्टार हॉस्पिटलचे सीईओ डॉ. धनराज चौधरी, डॉ. संदीप पाटील, तेजस माळी, शांताराम नाईक यांच्यासह जिएम नर्सिंग इन्स्टिटयूट, जामनेर येथील विद्यार्थी व सचिन थोरात यांनी महत्वाची भूमिका बजावली.

कार्यक्रमास भाजपा अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इंद्रिस मुलतानी, भाजपा जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, बद्रीभाऊ राठोड, तालुका अध्यक्ष संजय पाटील, राहुल राठोड, सुरज राजपूत, चत्तरसिंग बातले, शिवसिंग साबळे, ग्रामसेवक जी. एस. जाधव, आरोग्य सेवक श्रीराम चव्हाण, वायरमन एस. एन. साळवे, चेअरमन रामचंद्र शिंदे, विशाल राठोड, शरद पवार, सीताराम जाधव, आत्माराम पवार, अमोल चंद्रसिंग पवार तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार व राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो ओळ:

१. रवळा येथे मोफत आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी करताना वैद्यकीय पथक

२. शिबिरात उपस्थित रुग्णांची गर्दी