सोयगावमध्ये कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमांचे ऑनलाईन उद्घाटन

सोयगावमध्ये कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमांचे ऑनलाईन उद्घाटन

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते STEP कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणाची सुरुवात

 

प्रतिनिधी / सोयगाव:

देशातील युवकांना कौशल्याचे बळ देऊन रोजगार व उद्योजकतेस चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या “कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवनिर्मिती विभागा”तर्फे राबविण्यात येणाऱ्या “अल्पकालीन रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम (STEP)” अंतर्गत विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न झाले.

 

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण हुतात्मा विश्वनाथ राजहंस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोयगाव येथे करण्यात आले होते.

यावेळी उद्योजक इंद्रजीत खस (आयएमसी सदस्य) व विकास देसाई संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रमुख उपस्थित होते.

 

संस्थेचे प्राचार्य पी. एस. म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशिक्षण प्रमुख सौ. रेणुका कुलकर्णी यांनी STEP कार्यक्रमाची माहिती देताना, या अल्पकालीन अभ्यासक्रमांचे रोजगारक्षमतेतील महत्त्व विशद केले. त्यांनी नवीन प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत युवकांना स्वावलंबी बनवण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन सोमनाथ उगले यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डी. एम. बागुल, एम. एम. नेहते, दर्शन ठाकूर, पी. बी. रावते, नीता दांदळे, गोपाल पाटील, शेख लतीफ आदी कर्मचारी व स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.

आभार प्रदर्शन डी. एम. बागुल यांनी केले.