विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये साप्ताहिक कवायत

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये साप्ताहिक कवायत

शिक्षण विभाग पाचोरा तर्फे उपक्रमाचे आयोजन

 

पाचोरा – येथील पंचायत समिती शिक्षण विभागाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांनी दर शनिवारी शाळांमध्ये साप्ताहिक कवायत घेण्याची सूचना पाचोरा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना दिली आहे. सदर उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला असून विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाला चालना मिळाली आहे. या उपक्रमाला शा पो आ अधीक्षक सरोज गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील तसेच सर्व केंद्र प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभत आहे.कवायत म्हणजे शारीरिक क्षमतेत वाढ करणारी आणि सांघिक भावनेला प्रोत्साहन देणारी एक शिस्तबद्ध शारीरिक प्रक्रिया होय.

कवायतीचे फायदे:

शिस्त: शाळेत किंवा इतर सांघिक कार्यांमध्ये शिस्त वाढते.

समन्वय: शारीरिक संतुलन आणि हालचालींमधील समन्वय सुधारतो.

एकात्मता: लोकांमध्ये एकोप्याची भावना वाढते. सदर उपक्रमात पाचोरा तालुक्यातील दोनशे पन्नास शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावी मधील सुमारे पन्नास हजार विद्यार्थी सहभागी आहेत.