कृष्णापुरी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी श्री ओम प्रकाश पाटील व व्हाईस चेअरमन पदी श्री शिवाजी चौधरी यांची एक मताने निवड
(पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले)
पाचोरा तालुक्यातील देशमुखवाडी भागातील अग्रगण्य असलेली पाचोरा कृष्णापुरी सोसायटी गेल्या अनेक वर्षापासून श्री सतीश बापू शिंदे यांच्या गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून एक हाती सत्ता असून त्यांनी शेतकरी सभासदांसाठी महत्त्वाचे निर्णय घेऊन ही सोसायटी नफ्यात ठेवून आजही त्या संस्थेचे ते कामकाज पाहत आहे त्यांनी स्वतःकडे चेअरमन पद न ठेवता सर्व संचालकांना चेअरमन व्हाईस चेअरमन ची संधी देऊन संचालकांना संधी दिली नुकतीच आता त्यांनी पाचोरा तालुक्याचे माजी आमदार सहकार महर्षी व संस्थेचे आधारस्तंभ कै अण्णासाहेब श्री सुपडू भादू पाटील यांचे पणतू श्री ओम प्रकाश प्रभाकर पाटील यांची चेअरमन पदी निवड केली असून व्हाईस चेअरमन पदीश्री शिवाजी चौधरी यांची एकमताने निवड करून त्यांना संधी देण्यात आली.
यावेळी या पदाधिकाऱ्यांचा सत्कार श्री सतीश बापू शिंदे,श्री धोंडू हटकर,श्री दिगंबर अहिरे श्री दिलीप नागणे,श्री प्रकाश चौधरी,श्री शिवाजी महाजन,श्री काशिनाथ पाटील,श्री प्रेमलाल देसाई,सौ.सिंधुताई शिंदे,सौ. मुक्ताबाई बोरसे,संस्थेचे सचिव श्री नारायण चौधरी,लिपिक श्री मयूर चौधरी या सर्वांनी त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले सदरची निवड ही निवडणूक निर्णय अधिकारी श्री डी.बी.अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी सर्व संचालक मंडळ व मॅनेजर कर्मचारी उपस्थित होते.