जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य उत्सवात श्री. गो.से. हायस्कूल चा द्वितीय क्रमांक

जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य उत्सवात श्री. गो.से. हायस्कूल चा द्वितीय क्रमांक

 

 

बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव येथे दिनांक 29 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य उत्सवात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल ने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

. *विज्ञानातील महिला* हा या नाट्याचा विषय होता. विद्यालयातील विज्ञान शिक्षिका श्रीमती अर्चना काळे मॅडम यांनी या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले. विज्ञान शिक्षिका श्रीमती टी.पी. राजपूत मॅडम यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

इयत्ता नववी व दहावीच्या 10 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या नाट्यात सहभाग घेतला.

श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. जळगाव व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

.. शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.भाऊसो.श्री. दिलीप वाघ, चेअरमन मा. नानासो. श्री संजय वाघ, मानद सचिव मा.दादासो. श्री. महेश देशमुख, व्हाईस चेअरमन मा.नानासो. श्री.व्ही.टी.जोशी, शालेय समिती चेअरमन मा. दादासो. श्री.खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन मा. अण्णासो. श्री.वासुदेव महाजन, संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन. आर. ठाकरे सर,उपमुख्याध्यापक श्री.आर.एल. पाटील सर, इतर सर्व पदाधिकारी, विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.