जालन्यातील पारध गावातील जवळपास दोनशे शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित…..
तलाठी, आणि कृषी सहाय्यकाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित
|श्री महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी प्रतिनिधी :- पारध शाहूराजे:|जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पारध गावातील जवळपास दोनशे शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहे.तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांच्या हलगर्जीपणामुळे गावातील जवळपास 200 पेक्षा जास्त शेतकरी शेतकऱ्यांना 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच अनुदान मिळालेलं नाही. अनुदानासाठी शेतकऱ्यांनी या अगोदर दोन वेळा लागणारी कागदपत्रे ग्रामसेवक यांच्याकडे जमा केलेली आहे. तरीसुद्धा वंचित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून कुठलेही अनुदान जमा झाले नाही पारद येथील काही शेतकऱ्यांचे विके नंबर तयार झालेले आहेत तर काही शेतकऱ्यांचे अजून नुकसान भरपाईच्या यादीत नाव सुद्धा दिले नाही तरी शासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने राहिलेल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान खात्यात जमा करावे.
कोट:- सागर देशमुख (सामाजिक कार्यकर्ते)
पारद येथील जवळपास 200 शेतकऱ्यांचे गारपीट अनुदान अजून आले नाही ,बरेच शेतकऱ्यांचे विके नंबर तयार आहे तर बरेच शेतकऱ्यांची यादीत नाव न आल्यामुळे शेतकऱ्यांची केवायसी पेंडिंग आहे तरी शासनाने याकडे लक्ष देऊन गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान जमा करावे.
कोट:- सुदर्शन लोखंडे (शेतकरी)
माझा शेतामध्ये मी हरभऱ्याची लागवड केली होती त्यावेळेस गारपीट झाल्यामुळे शेतातून मला एक रुपयाचा सुद्धा उत्पन्न मिळाला नाही , बरेच शेतकऱ्यांना गारपीटीच्या अनुदान जमा झाले, मी मागच्या सहा महिन्यापासून बराच वेळ तलाठी, कृषी सहाय्यक व तहसील कार्यालयामध्ये कागदपत्राचा पाठपुरावा करत आहे माझ्या केवायसी होऊन जवळपास सहा महिने होऊन गेले अजून सुद्धा मला गारपिटीचा अनुदान जमा झाले नाही.