सामनेर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा उद्या कार्यक्रम

सामनेर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा उद्या कार्यक्रम

सामनेर ता पाचोरा(वार्ताहर) ता.02 येथील पुरातन असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाव सहभागातून जीर्णोद्धार करून मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी व संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत मुक्ताई व श्री गणेश ची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करण्यात आली आहे.आजपासून कार्यक्रम सुरू होणार आहेत दि 3 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता भव्य शोभायात्रा दि 4 एप्रिल यजमानांना दसवीधा स्थान, प्रायचित्त संकल्प, मंडप प्रवेश, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन नंदी श्राद्ध कर्म वास्तु मंडळ योगिनी मंडळ क्षेत्रपाल मंडळ सर्व तो भद्र मंडळ स्थापना देवाला जलधीवास दिनांक 5 एप्रिल रोजी स्थापित देवता प्राप्त पूजन, देवाला दशाविध स्थान, आणि 81 कलश द्वारे दिव्य औषधी स्नान, नवग्रह हवन मुख्य देवता हवन शांती पोस्टीक हवन आणि देवाला धान्य अधिवास 6 एप्रिल देवाला निद्रेतून प्रबोधन, स्थापित देवता वन बलीदान पूर्णाहुती देवाची मुख्य प्राणप्रतिष्ठा व संतांची प्राणप्रतिष्ठा महापूजा कलशारोहन व महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे प्राणप्रतिष्ठा समारोह श्री राम आश्रम नांद्रा चे मठाधिपती श्री श्री 1008 डॉ विष्णू दास जी महाराज जी स्वामी महाराज यांच्या हस्ते मूर्ती स्थापना कलश पूजन व प्रवचन संपन्न होणार आहे प्राणप्रतिष्ठेचा चे मुख्य आचार्य भागवत रामायण संत चरित्र सेवक वेदमूर्ती देवेंद्र दीपक साखरे तर सलग रोज रात्री भागवत कथाकार ह भ प बापू महाराज देशमुख जानोरीकर शेगाव यांच्या श्री मुखातून भागवत कथा संपन्न होणार आहे तरी परिसरातील सर्व भाविकांनी कार्यक्रमाचे लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सामनेर यांच्याकडून करण्यात आले आहे. फोटो विठ्ठल रुक्मिणी मंदिर