कोपरे येथे पावसामुळे दरवाजात करंट उतरल्याने शाॅक लागून एकाच घरातील चौघे बालंबाल बचावले, मात्र एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) उत्तरा नक्षत्राच्या पाऊसाने सर्वत्र धुमाकूळ घालत जोरदार अतीव्रुष्टी केल्यामुळे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ठिक ठिकाणी ओढे नाले चिंब झाले होते.तर काही ठिकाणी डांबरी रस्तेच वाहून गेले होते.अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे मात्र पावसामुळे दरवाजात करंट उतरल्याने पाच जणांना शाॅक लागून एकाच घरातील चौघे जण बालंबाल बचावले होते.मात्र एका शाळकरी विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू झाला आहे. या बाबतची माहिती अशी की शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोपरे ग्रामपंचायत सदस्य शंकर मारूती उघडे यांच्या घरा समोरील गेटमध्ये करंट उतरल्याने त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर शंकर उघडे,त्यांचे बंधू शिवाजी मारुती उघडे,भावजय सौ. मिनाताई शिवाजी उघडे,पुतणे विशाल शिवाजी उघडे, दुसरे पुतणे दत्तात्रय शिवाजी उघडे यांना विजेचा जोरदार धक्का बसला होता.शेजारी राहणाऱ्या लोकांनी सदर घरातील विजेचा प्रवाह खंडित केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला होता.विजेचा धक्का लागलेल्या पाचही जणांना तिसगाव येथील श्री हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.विशाल आणि दत्तात्रय यांना जबरदस्त धक्का लागल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना अहिल्यानगर येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले होते.नगर येथील डॉक्टरांनी दोघांची तपासणी केली असता त्यांनी दत्तात्रय शिवाजी उघडे (वयवर्षे१८)याला मयत म्हणून घोषित केले होते.मयत दत्तात्रय उघडे हा शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयातील बारावीचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी होता.तो बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना अनेक मित्रांचा लाडका मित्र बनला होता.दत्तात्र्यय उघडे याच्या आकस्मिक मृत्यूमुळे संपूर्ण उघडे परीवारावर दुख्खाचा डोंगर कोसळून सर्वत्र शोककळा पसरली आहे. एकाच घरातील पाच जणांना शाॅक बसणे ही कोपरे गावातील पहीलीच घटना आहे.मोठ्या शोकाकुल वातावरणात माळावरील नवीन स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.साखर कारखान्यासाठी उस तोडून अतिशय कष्टाळू आणि प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेला शालेय विद्यार्थी दत्तात्रय याचा मृत्यू होणे ही उघडे कुटुंबियांच्या द्रुष्टीने अतिशय वेदनादायी बाब आहे.दत्तात्र्यय याच्या म्रुत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.