प्रस्थापितांच्या विरोधात तरुणांची फौज तयार करणार : प्रा. किसनराव चव्हाण
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकी साठी प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात तरुणांची फौज तयार करणार असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसनराव चव्हाण यांनी केले.ते शेवगाव येथील ममता लाॅन येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष योगेश साठे हे होते.प्राध्यापक चव्हाण पुढे म्हणाले की सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मी हे काम स्वीकारले आहे.आगामि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे करणार असून प्रत्येक गावात तरुणांची ताकद उभी करणार असल्याचे सांगून मी व्यक्तीगत हितापेक्षा समाज हिताला जास्त महत्त्व देतो असे निक्षून सांगितले.प्रारंभी शेवगाव तालुका अध्यक्ष पॅरेलालभाई शेख यांनी प्रास्ताविकात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढविण्याचे रणशिंगच फुंकले.सचिन धस,अरुण बनगैया, बंडू धस,बाळू जगधने, विकास मगर,लुकस गजभिव,पुजा गजभिव,आयुष पठाण,राजू दुसंग, मोहम्मद सय्यद,रुबिना पठाण, अनुसया शिराळे, आलिशान पठाण,रफिया पठाण,लिला आव्हाड, बाबासाहेब लिंबोरे,देविलाल परसैया इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.यावेळी जिल्हाअध्यक्ष योगेश साठे, पाथर्डीचे पप्पू बोर्डे,अरुण झांबरे, विजय शहाळे, बाळासाहेब धस, ओमप्रकाश ससाणे,युवा अध्यक्ष आगस्टीन गजभिव,शाहुराव खंडागळे,अरुण खर्चन यांनी आपले विचार व्यक्त केले.प्रत्येक गावात किमान आकरा कार्यकर्त्यांची एक कमेटी स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पाथर्डी पोलिस स्टेशन समोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे.त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.एका गावातील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महीलेने”चव्हाण सर आमुचा नेता,नेक स्वाभिमानी हाय रं” ही स्वरचित कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.आभार रविंद्र निळ यांनी मानले.