पाचोऱ्यात श्री.गो.से.हायस्कूल येथे शिक्षक -पालक सभा उत्साहात संपन्न
आज दिनांक 9/9/2025 मंगळवार रोजी श्री.गो.से.हायस्कूल.मध्ये शिक्षक-पालक सभा सकाळी ठीक 10.30 वाजता कलादालन मध्ये संपन्न झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एन.आर.पाटील. यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत मंचावर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील,पर्यवेक्षिका सौ.अंजली गोहिल मॅडम ,श्री.आर.बी.तडवी,श्री.आर.बी. बांठिया व ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पी.एम.पाटील.तसेच पालक प्रतिनिधी श्री.शांताराम माने सर व श्रीमती मनीषा ब्राह्मणे उपस्थित होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व दिवंगत लोकनेते आप्पासाहेब ओंकार वाघ यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आले. संगीत शिक्षक श्री सागर थोरात यांनी स्वागत गीत म्हटले.
शिक्षक पालक सभेचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.आर.एल. पाटील.यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी शिक्षक- विद्यार्थी व पालक हे तीन महत्त्वाचे घटक शिक्षण प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे असतात. शिक्षकांसमवेत पालकांनीही आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जागरूक रहावे असे मनोगत त्यांनी प्रास्ताविकातून केले.
अध्यक्षीय भाषण व मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील.सर यांनी केले. बदलत्या काळानुसार पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांवर संस्कार करावेत, आपल्या पाल्याच्या अभ्यासाचा आढावा घेऊन शाळेतील शिक्षकांशी संपर्कात रहावे असे सांगितले. विद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा व उपक्रम यांची माहिती त्यांनी दिली.
पालक प्रतिनिधी म्हणून श्री शांताराम माने सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या शैक्षणिक प्रगती संदर्भात त्यांनी शाळेबद्दल गौरवोद्गार काढले.
शिक्षक पालक सभेस सकाळ सत्रातील 150 पालक व माता-भगिनी उपस्थित होते. शिक्षक पालक सभेचे सूत्रसंचालन श्री.आर.बी. बोरसे. व आभार प्रदर्शन श्री.रुपेश पाटील. यांनी केले.