ईद-ए-मिलाद आठवड्यात एकता फाउंडेशनचे नवीन उपक्रम
पाचोरा शहरात सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी सुप्रसिद्ध बहुउद्देशीय सामाजिक संस्था एकता फाउंडेशन मार्फत ईद-ए-मिलाद सन साजरा दरम्यान आठवड्याभरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यावर्षी मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 वी जयंती असल्याने , त्याला उत्साह पूर्वक व वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आठवड्याभरात उपक्रम राबवले.शाळेत शिक्षण घेत असणारे विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून, फळ व खाद्यपदार्थाची वाटप केली.पाचोरा शहरात निघणारे ईद-ए-मिलाद जुलूस मध्ये प्रचंड गर्दी असते. ह्या गर्दीला बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनालाही घाम सुटते.यावर्षी ईद-ए-मिलाद व गणपती विसर्जन सोबत असल्याने पाचोरा शहरात कोणतीही अप्रिय घटना न घडून, कोणालाही गालबोट न लागून,दोघे सण शांततेने पार पाडावे, यासाठी त्यांनी लोकांशी शांततेची अपील केली.उपाय म्हणून ईद-ए-मिलाद रोजी फाउंडेशन ने मिरवणूक शिस्त साठी आपले प्रतिनिधी नेमले. ह्या प्रतिनिधींनी मिरवणूक मध्ये शिसत ची आठवण करून लोकांना वेळोवेळी शांततेची अपील केली. अशाप्रमाणे त्यांनी एक प्रकारे प्रशासनाची मदत केली.ईद-ए-मिलाद रोजी मिरवणूक मध्ये सामील होणारे प्रत्येक व्यक्तीसाठी पाणी व नाश्त्याच्या बंदोबस केला. यावेळी पाचोरा शहराची सर्वात मोठी मशीद, नूर मशीद चे खतीब व इमाम जीशान रजा यांनी त्यांचे सामाजिक कार्याचे कौतुक करून, भविष्य मध्येही त्यांची सामाजिक सेवा अशाच प्रमाणे सुरू राहतील यासाठी व फाउंडेशनचे प्रगतीसाठी भरभरून दुवा केली. नवनवीन सामाजिक कार्य व उपकरणाबद्दल त्यांचे प्रशासन व शांतता प्रिय लोक पासून कौतुक होत आहे.ईद-ए-मिलाद रोजी पाणी व खाद्य पदार्थ वाटप वेळी फाउंडेशन चे अध्यक्ष शफीयोद्दीन मन्सुरी,उपाध्यक्ष हारून बागवान,सेक्रेटरी रज्जू बागवान,जलील खान,मोहम्मद लखारे, इम्रान टकारी,रशीद पिंजारी,निसार टकारी,शकील पिंजारी, रहीम बागवान, सलीम बापू, शाकीर आप्पा, तसलीम बागवान,यासीन बागवान,आदी मान्यवर उपस्थित होते.