जळगाव जिल्ह्या BSNLच्या TIP असोसिएशनची स्थापना
जळगाव, दि. २५ ऑगस्ट २०२५ भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सर्विस प्रोव्हायडर्स (TIP) असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. या असोसिएशनच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील BSNL FTTH इंटरनेट कनेक्शन च्या तांत्रिक आणि प्रशासकीय समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी झालेल्या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली, ज्यात अध्यक्षपदी संजय भाऊराव नेवे यावल, उपाध्यक्षपदी विकास मराठे जळगाव, तर सचिवपदी गोकुळ सोनार पाचोरा सहसचिव जीवन वाघ जामनेर खजिनदार महेश साळी जळगाव सल्लागार सचिन पाटील पारोळा सदस्य किरण चोरट चाळीसगाव, राहुल सपकाळे जामनेर,उमेश पाटील धरणगाव,दीपक जाधव चोपडा,दिनेश दुट्टे जळगाव,जितेंद्र पाटील जळगाव, पंकज शिंदे जळगाव ,सौरव काशीव जळगाव ,गणेश खोडके जळगाव, जुबेर शेख जळगाव ,यांची निवड करण्यात आली आहे. , अशी माहिती असोसिएशनकडून देण्यात आली आहे.
या असोसिएशनमुळे BSNL FTTH इंटरनेट कनेक्शन टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सर्विस प्रोव्हायडर्स च्या कामकाजात अधिक सुलभता येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच,इंटरनेट कनेक्शन च्या समस्या सोडवण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरेल असेही सांगण्यात आले आहे.