वडगांव आंबे ग्रुप ग्राम. उपसरपंच पदी अँड.सुवर्णा भिकन घोडके / अँड.सुवर्णा दीपक गायकवाड यांची बिनविरोध निवड

वडगांव आंबे ग्रुप ग्राम. उपसरपंच पदी अँड.सुवर्णा भिकन घोडके / अँड.सुवर्णा दीपक गायकवाड यांची बिनविरोध निवड

 

 

 

वडगाव आंबे (प्रतिनिधी)

१३ ऑगस्ट २०२५, बुधवार रोजी उपसरपंच पदा करता निवडणूक झाली असता, अँड.सुवर्णा भिकन घोडके त्याचा एकमेव अर्ज आल्याने गृप ग्राम पंचायत वडगाव आंबे उपसरपंच पदी त्याची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

यावेळी निवडणूक अधिकारी अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच बबलू मस्तान तडवी हे होते. मात्र वेळ संपेपर्यंत एकमेव अर्ज आलेला असल्याने सरपंच बबलू तडवी यांनी एडवोकेट सुवर्णा घोडके यांची उपसरपंच पदी निवड केली. एडवोकेट सुवर्णा घोडके ह्या अमोल शिंदे यांचे खंदे समर्थक दीपक गायकवाड यांच्या पत्नी आहेत.

 

निवडून आल्या नंतर उपसरपंच अँड सुवर्णा घोडके व सहकारी यांनी ग्राम देवता अंबिका मातेचा आशिर्वाद घेऊन,श्री.कृष्ण मंदिरात जाऊन श्री कृष्ण देवाचे दर्शन घेतले.

 

मावळत्या उपसरपंच लता सुरेश चव्हाण यांनी उगवत्या उपसरपंच सुवर्णा घोडके यांचा सत्कार केला.

यावेळी माजी उपसरपंच हर्षदा हर्षल पाटील व सदस्या शंकुतलाबाई जाधव, सुलोचनाबाई जाधव, ग्राम पंचायत सदस्य मच्छिंद्र थोरात, दत्तू जाधव, नितीन निकम, फिरोज तडवी, युवराज चव्हाण, हर्षल दिनकरराव पाटील,संजय प्रभाकर पाटील, अशोक गायकवाड, मिलिंद भुसारे, मंगेश पाटील, अँड.मंगेश गायकवाड, मुकेश पाटील, गजानन चंद्रे, उमेश शिंदे, रमेश जाधव, रवि जाधव, आण्णा गायकवाड, दिपक गायकवाड, ग्रामविकास अधिकारी म्हस्के आप्पा,ऑपरेटर प्रमोद चव्हाण, लिपिक सुनिल निकम, मंगेश खैरनार, संतोष निकम, लतिफ तडवी, गजानन जाधव ह्यांनी उपसरपंच याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

 

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे ग्रामविकास अधिकारी यांनी स्पष्ट केले.