लोहारी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
लोहारी गावातील जय जवान जय किसान ग्रुप तर्फे 26 जानेवारी व 15 ऑगस्ट निमित्त सालाबाद प्रमाणे आर्वे, इंदिरानगर, लोहारी खु., व लोहारी बु. या चारही जिल्हा परीषद शाळेतील सर्व विद्यार्थ्याना सतत चार वर्षा पासून वाटप करण्यात येतं असुन मग ते स्कूलबॅग, टिफीन बॉक्स, कंपास बॉक्स, मिलटीयन पाणी बॉटल, व मॅजिक बुक, क्रीडा साहित्य बॅटमिंटन, क्रिकेट साहित्य फूट बॉल विथ नेट व्हॉली बॉल विथ नेट परत स्कूल बॅग हे फक्त आणि फक्त जय जवान जय किसान ग्रुप मार्फत देण्यात आले आहेत हे फक्त आपल्या गावातील पोलीस व सर्व सैनिक व आजी माजी पोलीस व सैनिक यांच्या स्वखर्चातून हे कार्यक्रम सलग चार वर्षा पासून होत आहेत आणि हे कार्य फक्त जय जवान जय किसान ग्रुप मार्फत होत आहे लहान मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आम्हा सर्वांना खुप खुप आनंद होत असतो जय जवान जय किसान जय हिंद जय भारत.