आखेगाव पंचायत समिती गणातून पप्पू केदार यांची घौडदौड सुरू,भाजप ओबीसी कार्डचा वापर करणार?
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) आगामी होउ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातही निवडणूकीचे वारे वाहु लागले आहेत.थाटे गावातील लोकनियुक्त सरपंच आणि भाजपा महिला युवा मोर्चा आघाडीच्या शेवगाव तालुका अध्यक्ष सौ.शितलताई केदार यांचे पती पप्पू केदार यांनी आखेगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरूण भाउ मुंडे यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.पप्पू केदार हे कोणताही राजकीय वारसा नसलेले राजकीय सामाजिक कार्यकर्ते आहेत.तसेच ते अरूण भाउ मुंडे यांच्या मुशित तयार झालेले आणि कोरी पाटी असलेले सामाजिक कार्यकर्ते आहेत.त्यांनी आखेगाव पंचायत समिती गणात तरुणांची फौज तयार करून जनसंपर्क वाढवून गोरगरिबांना गरजेच्या वेळी मदतीचा हात देणारा कार्यकर्ता म्हणून आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. थाटे गावातही विविध विकास कामांचा जोर लावून सामाजिक क्षेत्रातही आपल्याच गावात अनेक विकास कामांच्या माध्यमातून वेगळा असा ठसा उमटवला आहे.लोकांच्या कल्याणासाठी अनेक बॅंकांच्या विरोधात वेगवेगळ्या विषयांवर अनेक आंदोलन करून आपली जनमानसातील प्रतिमा उंचावली आहे.जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केदारांची घौडदौड सुरू असुन ते जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी भाजपाचे तिकिट मिळवण्याच्या स्पर्धेत प्रथम रांगेत सहभागी झाले आहेत.सर्व सामान्य जनतेचे हीत जपणारा आणि लोकांना मदतीच्या वेळी हात देणारा कार्यकर्ता म्हणून पप्पू केदार यांच्या माध्यमातून नवा चेहरा आगामी होणाऱ्या निवडणुकीत लोकांसमोर येत आहे. पप्पू केदार हे जय भगवान महासंघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या कडे राजकीय पाठबळ असल्यामुळे ते निश्चितच विजयाचा गुलाल आपल्या अंगावर घेऊन एक नवा इतिहास निर्माण करतील अशी परिस्थिती आखेगाव पंचायत समिती गणात निर्माण झाली आहे.