नेवाशाच्या ज्ञानेश्वर माउली (दींडी)पालखी सोहळ्यास शासनाने सर्व प्रकारचे सहाय्य मिळावे : आमदार मोनिकाताई राजळेंची विधानसभेत लक्षवेधी.
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) दरवर्षी जून महिन्यात आषाढी एकादशीला देहू येथून संत तुकाराम, आळंदी येथुन संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी निघतात.तसेच या दिंड्या प्रमाणे महाराष्ट्रातून आणि देशातील वेगवेगळ्या राज्यातून संत एकनाथ,संत नामदेव, संत निवृत्तीनाथ,संत जनाबाई यांच्याही पालख्या दींड्या घेऊन पंढरपूरकडे विठूरायाच्या दर्शनासाठी जातात त्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळतात. त्याच प्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथील ज्या पैस नावाच्या खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ठिकाणाच्या संत ज्ञानेश्वर माउली मंदिरा पासुन हा पालखी दींडी सोहळा १९ जूनला पाच ते सहा हजार भाविक घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेला आहे. महाराष्ट्रातील ईतर १७ नोंदणीक्रुत पालख्यातील दिंड्या प्रमाणे याही ज्ञानेश्वर पालखी दींडी सोहळ्याची नोंदणी झालेली आहे. शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्या प्रमाणे या मंदिराच्या विकासाची चारशे कोटीची विकास कामे सुरू आहेत.परंतु राज्यातील ईतर दिंड्या प्रमाणे या पालखी दींडी सोहळ्यासाठी शासनाचे कोणत्याही प्रकारचे सहाय्य आणि अनुदान मिळालेले नाही तरीही पुढील वर्षापासून वैद्यकीय ॲम्ब्युलन्स सुविधा,पिण्याचे पाणी व्यवस्थापन, मुक्कामाच्या ठिकाणी फिरते सौचालय, पोलिस संरक्षण, या सुविधा मिळाव्यात अशी या पालखी सोहळ्याचे आयोजन ह.भ.प.राम महाराज झिंजुर्के आणि देविदास महाराज म्हस्के यांनी मागणी केली आहे. पुढील वर्षापासून या सगळ्या सुविधा वारकऱ्यांना मिळाल्याच पाहिजे अशी मागणी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी वाधानसभेत लक्षवेधी सूचना मांडताना केली आहे.या विधानसभेतील औचित्याच्या मुद्द्याचे या दींडीचे मानकरी सारथी ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांनी जोरदार स्वागत केले आहे. शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील सदगुरू संत यादव बाबा वाघोलीकर यांच्या पालखी दिंडी सोहळ्यासाठी ही शासनाचे अनुदान मिळावे अशी मागणी या दींडी सोहळ्याचे मुख्य सेवेकरी ह.भ.प. भाऊसाहेब महाराज भालसींग यांनी केली आहे.