मुस्लिम-हिंदू विद्यार्थीनीवर चाकूचा वार करणाऱ्या नराधमाच्या शेवगाव पोलिसांनी मुसक्या आवळून गजाआड केले
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) शुक्रवार दिनांक २७ जुन सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान दोन शालेय विद्यार्थीनी एक (हिंदू मुस्लीम)आपला खाजगी क्लास संपवून दुचाकी वरून आपल्या घरी चालल्या होत्या.त्यात अल्पवयीन पिडीत मुलीने पांढऱ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्सची पॅन्ट घातलेली होती.आणि गळ्यात भगवा रुमाल परीधान केलेला होता.तर तीच्या मुस्लिम समाजातील काळा बुरखाधारी मैत्रीणीस ती तीच्या घरी सोडण्यासाठी शेवगाव येथील कुंभार गल्ली खालची वेस येथुन नायकवडी मोहल्ला या भागात जात असताना यातील आरोपी (१) अलाउद्दीन हशमोद्दीन शेख राहणार, नायकवडी मोहल्ला, शेवगाव आणि(२) गुलामगौष कुरेशी, राहणार, खाटीक गल्ली, शेवगाव यांनी स्कूटी मोटार सायकल वर येऊन पिडीता चालवित असलेल्या मोटार सायकलला गाडी आडवी लावून यातील पिडीत अल्पवयीन मुलीने मुलांचा ड्रेस घातल्यामुळे हा हींदू मुलगा असुन तो मुस्लिम समाजातील मुलीला मोटार सायकल वर बसून पळवून घेऊन जात असल्याच्या संशयावरून पिडीतेचा वाईट उद्देशाने हात पकडून आरोपी अलाउद्दीन हशमोद्दीन शेख यांनी त्यांच्या जवळ असलेल्या चाकुने पिडीतेस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तीच्या गळ्यावर वार केला असता पिडीतेने डावा हात मध्ये घातल्याने पिडीतेच्या डाव्या हाताच्या दंडावर गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे.वरील वर्णनावरून शेवगाव पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ५६९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०९,७४,१२६,(२),३(५)सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण व प्रतिबंधक अधिनियम २०१२चे कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी अलाउद्दीन हशमोद्दीन शेख, राहणार, नायकवडी मोहल्ला, शेवगाव हा गुन्हा केल्यानंतर लगेचच गावातून फरार झाला होता.शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी अलाउद्दीन हशमोद्दीन शेख, राहणार नायकवडी मोहल्ला, शेवगाव हा शहरातील बाळासाहेब भारदे हायस्कूल परीसरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती.मग पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी एक पोलिस पथक तयार करून सदर आरोपीच्या मागावर पाठवले होते.सदर आरोपी हा त्या ठिकाणाहून पळून जात असताना त्याला शेवगाव पोलिसांनी शिताफीने रंगेहाथ पकडले.व त्यास शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये दाखल करून त्याच्या मुसक्या आवळून गजाआड केले.आणि पुढील कायदेशीर कारवाई पूर्ण केली.सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब, सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलिस सब इन्स्पेक्टर प्रविण महाले, पोलिस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ खेडकर, पोलिस कॉन्स्टेबल भगवान सानप,शाम गुंजाळ, देविदास तांदळे, राहुल आठरे, आदिनाथ शिरसाठ, प्रशांत आंधळे, अस्लम शेख, भारत अंगरखे, दादासाहेब खेडकर, तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलिस काॅंन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत. शालेय विद्यार्थीनींनी मुलांचा ड्रेस घातल्यामुळे किती आपत्ती निर्माण झाली याचा सर्व विद्यार्थीनींनी या घटनेतून बोध घेतला पाहिजे.

























