पाथर्डीत वादग्रस्त ठरत राहुरीला बदलून आलेले गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पाथर्डीत वादग्रस्त ठरत राहुरीला बदलून आलेले गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे हे पाथर्डी पंचायत समितीचा कारभार सांभाळत असताना अतिशय वादग्रस्त ठरले होते. पाथर्डी पंचायत समितीच्या कारभारात त्यांच्यावर अनेक घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या घोटाळ्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.आता अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे हे काम पहात होते.राहुरी तालुक्यातील एक ५८ वर्ष वय असलेले सेवा निव्रुत ग्रामसेवक यांची गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्या अहवालानुसार अहिल्या नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली होती.त्या नंतर ते सेवानिवृत्त झाले होते.त्यांच्या वरील दोषारोपपत्राचा अहवाल गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी पाठवायचा होता.तो अहवाल तक्रार दार यांच्या बाजूने पाठविण्या करीता गटविकास अधिकारी यांनी दहा हजार रुपयांची लाच मागून ती स्वतः स्विकारलेली आहे. या बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आणि गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळून ताब्यात घेतले आहे.सापळा आणि तपासी अधिकारी म्हणून श्रीमती छाया देवरे, पोलिस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर, परीवेक्षण अधिकारी अजित त्रिपुटे पोलिस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर यांच्या सापळा पथकातील पोलिस नाईक चंद्रकांत काळे, सचिन सुद्रुक, आणि चालक हारून शेख यांनी नाशिक परीक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावल कर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. सर्व नागरिकांना कळविण्यात येते की जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय कार्यालयातील शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास १०६४ या टोलफ्री नंबर वर किंवा (९३७१९५७३९१) या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.