देवेंद्र फडणवीस उर्फ “देवाभाउ” जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचे शेवगाव येथे २८/२९ मे रोजी आयोजन
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाउ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचे अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील खंडोबानगर येथे २८ मे २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आले आहे. अहिल्या नगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदेमातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री, आँखेगावच्या जोग महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के,आणि रेणुका माता मल्टीस्टेटचे चेअरमन प्रशांत नाना भालेराव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.दिनांक 29 मे रोजी सायंकाळी सहा वाजता विजयी स्पर्धकांना महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा आणि पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व महाराष्ट्र वीधान परीषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांच्या हस्ते विजयी पैलवानांना बक्षीस वितरण सोहळा साजरा करण्यात येणार आहे.42 ते 84,120 किलो वजन गटातील विजयी मल्लांना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत. कै.छबुराव लांडगे यांच्या स्मरणार्थ प्रथम बक्षीस म्हणून चांदीची गदा देण्यात येणार आहे.प्रथम दोन लाख रुपयांची कुस्ती महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध दिल्ली रुस्तुम ए हींद अजय बनवाल यांच्यात होणार आहे. द्वितीय दीड लाख रुपयांची कुस्ती महाराष्ट्र केसरी प्रुथ्वीराज पाटील विरूद्ध महाराष्ट्र केसरी हर्षद सदगिर यांच्यात होणार आहे.त्रुतीय एक लाख रुपयांची कुस्ती नॅशनल मेडलिस्ट उषा कुमारी विरूद्ध नॅशनल मेडलिस्ट सोनाली मंडलिक यांच्यात होणार आहे. जिम व कुस्ती संकुलाचेही भव्य उद्घाटन या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी होणार आहे.तरी जिल्ह्यातील पैलवानांना या कुस्ती स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरूण भाउ मुंडे यांनी केले आहे.संघ परीवाराचे डॉक्टर जगदीश धुत यांच्या हस्ते लाल मातीची विधीवत पुजा करण्यात आली आहे.या वेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान वैभव लांडगे, खजिनदार पैलवान नाना डोंगरे,अजय बारस्कर, डॉ.धिरज लांडे,कडूभाउ मगर, भुषण देशमुख, अंकुश साळवी,नंदुभाउ मुंडे, नितीन मालानी,राम देहराडाय, वंजारे सर्,अंकुश ढाकणे हे आवर्जून उपस्थित होते. या बक्षीस वितरण सोहळ्याच्या समारंभा साठी माजी खासदार डॉ. सुजय विखे,आमदार मोनिकाताई राजळे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप,आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार अमोल खताळ,आमदार काशिनाथ दाते सर, भाजपाचे प्रदेश महामंत्री सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश कार्यालयीन प्रमुख,रवीजी अनासपुरे हे उपस्थित राहणार आहेत.तरी या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे नेते अरुण भाऊ मुंडे यांनी केले आहे.