Home पाचोरा तालुका शिक्षण शिवाय पर्याय नाही, मरकजी इमाम आले मुस्तफा

शिक्षण शिवाय पर्याय नाही, मरकजी इमाम आले मुस्तफा

शिक्षण शिवाय पर्याय नाही, मरकजी इमाम आले मुस्तफा

 

शिक्षण शिवाय पर्याय नाही, मुस्लिम तरुणांनी शिक्षित होऊन स्वतःला ,समाजाला व देशाला सक्षम बनावे असे प्रतिपादन नगरदेवळा जामा मस्जिद मरकजी इमाम आले मुस्तफा यांनी मुस्लिम समाजासमोर ईदुल फित्र चे भाषणात केले.आधी रोटी खाओ अपने बच्चो को पढाओ, घर कच्चा असल्या तरी आपल्या मुलांना शिक्षित करून सक्षम बनावा असे आव्हान त्यांनी केले. सोमवार रोजी नगरदेवळा येथे मुस्लिम बांधवाकडून शांतीपूर्ण रीतीने ईद-उल-फित्र (मिठी ईद)साजरा करण्यात आली. सकाळी आठ वाजता सर्व मुस्लिम बांधव जामा मस्जिद नगरदेवळा येथे जमा होऊन ईदगाह साठी निघाले. ईदगाह येथून नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी अल्लाह ला धन्यवाद प्रस्तुत केला.नंतर जामा मस्जिद इमाम मौलाना आले मुस्तफा यांनी जागतिक शांतता निर्माण होण्यास व आपला भारत देश विकसित व्हावा, जगामध्ये सुरू असलेले इजराइल फलसतीन युद्ध, रशिया युक्रेन युद्ध थांबवावे व जागतिक शांतता निर्माण व्हावी यासाठी प्रार्थना केली.मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदची शुभेच्छा दिली. भारत सरकार कडून संसदेत प्रस्तुत करण्यात येणारे वकफ संशोधन विधेयक याला संवैधानिक,लोकशाही व शांतीपूर्ण रीत्याने मुस्लिम बांधवांनी आपल्या हाताला कालीफिती बांधून विरोध दर्शविला. भारत सरकारने वकफ संशोधन विधेयक मागे घेऊन मुस्लिम बांधवांना ईद ची स्वगात द्यावी असे आवाहन मुस्लिम पंच कमिटी चेअरमन नूर बेग व गरीब नवाज फाउंडेशन अध्यक्ष अफरोज रहीम शेख यांनी केले. यावेळी मौलाना आले मुस्तफा, मौलाना जमशेद, मौलाना इशतीयाक रजा, नूर चेअरमन, शेख अफरोज रहीम, जावेद रहीम, वसीम पटवे, मुसशताक खान, उमर बेग, वसीम शेख, सय्यद इमरान अली, गनी सेठ, अन्नू मेंबर, वसीम शेख, कामरान खान, खालील बेग, जुबेर खान आदी मान्यवर उपस्थित होते.

Don`t copy text!