पाचोरा येथे दि.१४ डिसेंबर पासून श्रीमद भागवत कथेचे आयोजन

पाचोरा येथे दि.१४ डिसेंबर पासून श्रीमद भागवत कथेचे आयोजन

येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. आनंदवन संस्थान सोनगीर धुळे येथील मठाधिपती परमपूज्य गुरुवर्य डॉ. श्री मुकुंदराज महाराज हे आपल्या मधुर वाणीत कथेचे विवेचन करणार आहेत. डॉ श्री मुकुंदराज महाराज हे भागवतात डॉक्टरेट असून
त्यांना बेचाळीसहून अधिक देशांची मान्यता आहे. डॉ. श्री मुकुंदराजक महाराजांनी आजतागायत साधारणतः ५०० पेक्षा अधिक भागवत कथा केल्या आहेत. भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील महाराजांचा भक्त परिवार आहे.
लंडन, अमेरिका या देशात त्यांच्या कथा संपन्न झालेल्या आहेत.
सखोल व शास्त्रोक्त पद्धतीने कथेचे विश्लेषण करणे ही महाराजांची विशेष ओळख असून पाचोर्‍यात डॉ. श्री मुकुंदराज महाराज यांची प्रथमतःच भागवत कथा संपन्न होत आहे.
पाचोरा भडगाव रस्त्यालगत शक्तीधाम या ठिकाणी कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
कथा बुधवार दि.१४ डिसेंबर पासून गुरूवार २० डिसेंबर काळात संपन्न होणार आहे.
मंगळवार दि.१३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १४ डिसेंबर पासून कथा सकाळी ९.३० ते १२.३०व दुपारी ४ ते ७ अशा दोन सत्रात होणार आहे.
यात
दिनांक १४ रोजी श्रीमद भागवत महात्म्य, कथारंभ, मुनी जिज्ञासा, श्रीनारद-व्यास संवाद,
दि.१५ रोजी श्री शुक्र-परिक्षीत चरित्र, मनूकर्दम चरित्र, कपिलोपदेश, दि.१६ रोजी सती चरित्र, ध्रुवाख्यान, भरत चरित्र, आजामिलोद्धार, नृसिंह अवतार, दि.१७ रोजी गजेंद्र मोक्ष, श्रीवामन अवतार, श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव,
दि.१८ रोजी श्रीकृष्ण बांललिला, कुमारलीला, गोवर्धन पूजा,
दि.१९ रोजी रासक्रिडा, कंसवध, कृष्ण रुक्मिणी विवाह,
दि.२० रोजी द्वारकालीला, सुदामा पूजन, भागवत धर्म उद्धवोपदेश व कथा समाप्ती होणार आहे.
यानंतर दुपारी दिड वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पाचोरा शहरासह पंचक्रोशीतील भक्तांनी व भागवत प्रेमींनी या अलौकिक कथेचा लाभ घेण्याचे आवाहन गोविंद महाराज भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.