अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तर्फे आयोजित पाचोरा येथे ओबीसी बैठक उत्साहात संपन्न

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तर्फे आयोजित पाचोरा येथे ओबीसी बैठक उत्साहात संपन्न

आज रोजी 08-10-2023 पाचोरा येथील हुतात्मा स्मारक येथे ओबीसी बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये भडगाव येथे दिनांक 19-10-2023 रोजी आयोजित ओबीसी अधिकार मेळावा हजारोच्या संख्येने यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही भूमिका मांडण्यात आली ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी बैठकीचे अध्यक्ष स्थान भोला आप्पा चौधरी यांना देण्यात आले त्याचबरोबर मंचावर उपस्थित माळी समाज पंचमंडळाचे अध्यक्ष कैलास महाजन सर ,श्रीराम मोतीराम महाले, सुनिल शिन्दे ,बशीर दादा बागवान, सत्तार पिंजारी ,नंदकुमार सोनार, अशोक मोरे, अभिलाषा रोकडे महिला जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता तालुका अध्यक्ष सुदर्शन सोनवणे ( महाजन) ,संतोष महाजन पाचोरा तालुका कार्याध्यक्ष तसेच शहराध्यक्ष कन्हैया देवरे, माजी नगरसेवक वासुदेव महाजन ,संजय महाले,चिंधु मोकळ,डॉ. गोरख महजन ,चौधरी समाजाचे अध्यक्ष नारायण चौधरी ,दिलीप कासार कासार समाजा अध्यक्ष ,भगवान मिस्त्री सुतार समाज अध्यक्ष, मोहसीन खान तकारी तकारी समाजाध्यक्ष, रमेश जाधव नाभिक समाज अध्यक्ष ,माजी नगरसेवक दत्तात्रय जडे, माजी नगरसेवक विकास पाटील ,सुनील पाटील मराठा सेवा संघ अध्यक्ष ,क्षत्रिय ग्रुपचे धनराज पाटील ,जगदीश बापू सोनार ,प्रा.सी.एन.चौधरी ,अनिल आबा येवले, खान ,गणेश शिंदे, विठ्ठल महाजन ,नाना सांडू महाजन, शेख रसूल शेख उस्मान ,मयूर गजानन, गजानन महाजन ,ज्ञानेश्वर महाजन, बबलू महाजन,प्रमोद महाजन,संदीप पाटील, शुभम महाजन, नत्थु महाजन ,शिवाजी चौधरी ,सुनील महाजन, अविनाश सुतार ,किशोर डोंगरे ,भूषण पाटील ,एस.ए.पाटील ,सौरभ पाटील, दिलीप गायकवाड, माधव पाटील व इतर ओबीसी बांधव उपस्थित होते .बैठकीचे सूत्रसंचालन कैलास महाजन व आभार प्रदर्शन सुदर्शन महाजन यांनी केले.