पाचोरा लोक न्यायालयात ९३१ प्रकरणांचा निपटारा; २ कोटी ५६ लाख ८४ हजार २४२ रुपयांची वसुली

पाचोरा येथील लोक न्यायालयात ९३१ प्रकरणांचा निपटारा; २ कोटी ५६ लाख ८४ हजार २४२ रुपयांची वसुली

पाचोरा महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाने पाचोरा येथे तालुका विधी सेवा समिती तथा वकील संघ पाचोरा यांच्या सयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन दि. ०९/०९/२०२३ रोजी करण्यात आले होते. या लोक न्यायालयात पाचोरा न्यायालयात दाखल असलेली १६० दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली निघून १ कोटी ८१ लाख ३९ हजार ४५७ रुपयांची वसुली करण्यात आली तसेच ७७१ वादपुर्व प्रकरणांचा निपटारा होवनु ७५ लाख ४४ हजार ७८५ रुपयांची वसुली झाली असून यामध्ये एकुण पाचोरा न्यायालयात ९३१ प्रकरणा मध्ये २ कोटी ५६ लाख ८४ हजार २४२ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. लोकन्यायालयात 2 दिवाणी प्रकरणे व्हरच्युअली व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे निकाली काढण्यात आले. या लोकन्यायालय कार्यक्रमास तालुका विधी सेवा समिती पाचो-याचे अध्यक्ष तथा न्यायिक अधिकारी दिवाणी न्यायाधीश श्री जी.बी.औंधकर साहेब, सह दिवाणी न्यायाधीश एम. जी हिवराळे मॅडम, २रे सह दिवाणी न्यायाधीश श्री एल व्ही श्रीखंडे साहेब तसेच पंच सदस्य विधीज्ञ भाग्यश्री रामचंद्र मराठे, वकील संघाचे अध्यक्ष विधीज्ञ प्रविण पाटील, उपाध्यक्ष मंगेश गायकवाड, सचिव राजेंद्र पाटील, सरकारी अभियोक्ता आर.के. माने तसेच जेष्ठ विधीज्ञ मंडळी व न्यायालयी कर्मचारी वर्ग,अधिकारी, वकील मंडळी उपस्थीत होते. तसेच या पुढे होणाा-या लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवावा लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका विधी सेवा समिती पाचो’-याचे अध्यक्ष श्री जी. बी औंधकर साहेब यांनी केले.