संगिता लाड खान्देश हिरकणी पुरस्काराने सन्मानित

संगिता लाड खान्देश हिरकणी पुरस्काराने सन्मानित

पाचोरा-शहरातील गांधी चौक भागातील रहिवाशी खान्देशचे आराध्य दैवत कानुबाई मातेचे स्वरचित गिते व गायक म्हणून खान्देशात प्रसिध्द असलेल्या सौ.संगिता राजेंद्र लाड यांना खान्देश हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जळगाव माऊली फाऊंडेशन,जय महाकाली कलावंत सांस्कृतिक बहु.संस्था, सिंधुदुर्ग समृध्दी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवनात आयोजित विविध क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान सोहळा जळगाव येथील लोककलावंत विनोदजी ढगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी त्यांच्या समवेत व्यासपिठावर महाकाली ग्रुपचे संस्थापक गणेश अमृतकर, श्रीकांत रत्नपारखी जळगाव, नरेंद्र बाविस्कर,डॉ.बी.एन.खरात आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी मराठी झी टिव्हीचे अभिनेते सुनिल गोडबोले यांच्या हस्ते खान्देश हिरकणी पुरस्काराने सौ.संगिता लाड यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार वैभव खानवलकर यांनी मानले.