चोपडा महाविद्यालयात ‘भौतिकशास्त्र प्रश्नमंजुषा स्पर्धा’ उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘भौतिकशास्त्र प्रश्नमंजुषा स्पर्धा’ उत्साहात संपन्न

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागातर्फे “भौतिकशास्त्र प्रश्नमंजुषा स्पर्धेचे” दिनांक २०/०९/२०२३ रोजी दरवर्षीप्रमाणे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी हे उपस्थित होते. यावेळी भौतिकशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. पी.एम.रावतोळे, डॉ. व्ही.आर. हूसे, गोपाल वाघ, निरंजन पाटील, जितेन धोबी, प्राजक्ता वानखेडे, दर्शन पाटील आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ.पी. एम. रावतोळे यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. ए.एल.चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कु.सिद्धी महेश नेवे, द्वितीय पारितोषिक गौरव नामदेव बाविस्कर, तृतीय पारितोषिक कू.अश्विनी राजु पाटील तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक कू.सानिया अशोक बाविस्कर व दिनेश वसंत पाटील या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आले व त्यातून भावेश गोपाल वाघ, कु.तेजस्विनी ज्ञानेश्वर वाघ व सिद्धार्थ शेखर ठाकरे या तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सानिया अश्फाक पठाण, सय्यदा असना व गौरव बाविस्कर या विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी या प्रश्नमंजुषामुळे किती सखोल ज्ञानाची गरज असते व भविष्यातील स्पर्धेसाठी याचा उपयोग त्यांना नक्कीच होईल असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सिद्धी महेश नेवे यांनी केले तर आभार डॉ. व्ही.आर. हुसे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश भाट, जितेंद्र कोळी, विशाल पाटील यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.