पाचोर्‍यात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक भूमिपूजन सोहळा आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न

पाचोर्‍यात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक भूमिपूजन सोहळा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न!

पाचोरा येथे आज दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी पाचोरा येथील जवळपास ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित असलेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचा विषय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पूर्णत्वास आला आहे. पाचोरा आणि भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाचोरा येथे रेल्वे स्टेशनवर वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महात्मा ज्योतिबा फुले स्मारक बसवण्यात येणार असून यासाठी २० लाख रुपयांचा निधी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून दिला आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्मारकाचे काम सुरू केल्या बाबत सर्वत्र माळी व बहुजन समाजाच्या वतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. अतिशय खेळीमेळीचे वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सुनील शिंदे यांना देण्यात आले होते त्याच बरोबर यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह उद्योजक मुकुंद बिल्दीकर, माजी नगराध्यक्ष संजयजी गोहिल,माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील, माजी नगरसेवक डॉक्टर भरत पाटील, जिल्हा परिषदेचे रावसाहेब पाटील, मार्गदर्शक चिंचोले सर, संभाजी ब्रिगेडचे जिभाऊ पाटील, जिल्हा परिषद सदस्य पद्मसिंह पाटील, माळी समाजाचे श्रीराम नाना महाजन, नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक मोरे साहेब,सामाजिक कार्यकर्ते किशोर डोंगरे, बंडू चौधरी, सुनील पाटील, किशोर बारवकर तसेच आमदारांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र पाटील, प्रवीण ब्राह्मणे, दीपक आदिवाल, खलीलदादा देशमुख, अझर खान,सुनील पाटील जारगाव, संतोष परदेशी ,माळी समाज अध्यक्ष संजय महाले उपाध्यक्ष k s महाजन सर , चिंधु मोकळ , शरद गिते सर , डॉ गोरख महाजन,बापू महाजन,संतोष महाजन, सुनील महाजन, कन्हैया देवरे, नाना पंढरीनाथ महाजन, नाना सांडू महाजन , अशोक शिवलाल महाजन , युवराज बापू महाजन, m s महाजन सर , डॉ संजय जाधव ,मच्छिंद महाजन, सुधाकर महाजन, आबा विक्रम महाजन, मा नगरसेवक वासुदेव महाजन,साहेबराव महाजन,मयूर महाजन,अतुल मालकर, कैलास घोंगडे, N B महाजन, सुदर्शन सोनवणे , गजानन रोकडेभास्कर सुखदेव महाजन , संजय महाजन, प्रदीप वाघ सर ,नितीन पाटील सरआदी तसेच माळी समाजाचे विविध नेते, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संदीप बापू पाटील यांनी महात्मा ज्योतिरावजी फुले यांच्यावर गीत सादर केले ,प्रास्ताविक के एस महाजन सर यांनी मांडले सूत्रसंचालन प्रवीण ब्राह्मणे, आभार शरद गीते यांनी मानले