पाचोरा ग.स. शाखेच्या वतीने 67 ज्येष्ठ सभासदांचा सत्कार

पाचोरा ग.स. शाखेच्या वतीने 67 ज्येष्ठ सभासदांचा सत्कार

पाचोरा – येथील सरकारी नोकरांच्या सहकारी (गस) पतसंस्थेतर्फे जेष्ठ सभासदांचा सन्मान सोहळा दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी उत्साहात संपन्न झाला. श्री गो.से. हायस्कूलच्या कलादालनात संपन्न झालेल्या या सोहळ्यात 67 ज्येष्ठ सभासदांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

येथील पिटीसी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी व्यासपीठावर ग.सं सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसो रवींद्र मुकुंदराव सोनवणे, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी, शालेय शिक्षण समितीचे चेअरमन दादासो खलील देशमुख, ग स सोसायटीचे माजी उपाध्यक्ष नवल पितांबर पाटील, ग. स. सोसायटीचे माजी संचालक बापूसो सुनील निंबा पाटील, सुनील युवराज पाटील, विपिन वसंत पाटील, गो.से. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रमिला वाघ मॅडम, डॉ. अनिलदादा देशमुख, आर. एल. पाटील, प्रवीण रमेश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यानिमित्ताने सुनील युवराज पाटील, सुनील निंबा पाटील, खालील दादा देशमुख यांनी आपापली मनोगते व्यक्त केली.

नानासो संजय वाघ यांची, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या चेअरमन पदी नियुक्ती झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नानासाहेब संजय वाघ यांचा सत्कार करण्यात आला.

पाचोरा गस पतपेढीच्या शाखा क्रमांक एक, दोन व तीन मिळून एकूण 67 ज्येष्ठ सभासदांचा सत्कार व प्रत्येक ज्येष्ठ सभासदाला 5000 रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल माहिती देताना संपूर्ण लेखाजोखा सादर करत सभासदांना विविध आर्थिक लाभाच्या योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब संजय वाघ यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सर्व कार्यकारी मंडळाचे अभिनंदन केले. आणि सोबतच शासनाच्या नवीन शासकीय कर्मचारी नियुक्तीच्या बाबतीत असलेल्या उदासीन व वेळकाढू धोरणामुळे ग.स सोसायटीची सभासद संख्या कमी होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. योगेश शेलार यांनी प्रास्ताविक केले, तर खडकदेवळा विद्यालयाचे उपशिक्षक चंद्रकांत बाजीराव पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटन केले.