पाचोरा येथे श्री कैला मातेचा वार्षिक उत्सव

पाचोरा येथे श्री कैला मातेचा वार्षिक उत्सव

 

पाचोरा (प्रतिनिधी)

पाचोरा येथील श्री कैला माता मंदिराचा वार्षिक उत्सव दिनांक 27 व 28 एप्रिल 2023 रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने भाविकांनी या उत्सवात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे.

पाचोरा शहराच्या पश्चिमेला, भडगाव रोड लगत श्री कैला मातेचे जागृत देवस्थान आहे. पाचोरा, भडगाव व सोयगाव तालुक्यात श्री कैला मातेचे भाविक मोठ्या प्रमाणावर आहेत. दरवर्षी श्री कैला मातेचा वार्षिक उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी साजरा होणाऱ्या वार्षिक उत्सवात दिनांक 27 एप्रिल गुरुवार रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत श्री कैलामातेचे जागरण, भजन, आरती व प्रसाद इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी दिनांक 28 एप्रिल 2023, शुक्रवार रोजी दुपारी 11 ते 1:30 वाजे दरम्यान माताराणीचा “भंडारा” (महाप्रसाद) आयोजित करण्यात आला आहे.

श्री कैला माता मंदिर भडगाव रोड पाचोरा येथे आयोजित या वार्षिक उत्सवाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन श्री कैलामाता मंदिर वार्षिक उत्सव समिती व कैलामाता मंदिर ट्रस्ट यांचे तर्फे करण्यात आले आहे.