पाचोरा येथील पि जे रेल्वे सामान काढण्याचे काम सुरू केले पण पी.जे.बचाव कृती समिती यांनी तात्काळ दखल घेऊन थांबवले

पाचोरा येथील पि जे रेल्वे सामानाची हलवाहलव सुरू असता पि जे रेल्वे बचाव कृती समिती पाचोरा यांनी तात्काळ दखल घेऊन सदरचा सामान ऊचलन्याचे काम थांबवले

पाचोरा रेल्वे स्टेशन येथे आज कोणालाही काही माहिती नसताना भुसावळ येथून काही अधिकारी व कर्मचारी यांनी पि जे रेल्वे स्टेशन येथील पि जे चे सामान काढण्याचे काम सुरू केले व ते घेऊन जात असता तेथे तात्काळ बचाव कृती समिती धडक देऊन सदर सामान हलवण्याच्या कामास विरोध केला तेथून तात्काळ जळगाव विभागाचे खासदार श्री ऊन्मेश पाटील यांच्याशी संपर्क साधून सदर माहिती त्यांना दिली व त्यांना विनंती केली की हे काम तात्काळ थांबले पाहिजे खासदार श्री ऊन्मेश पाटील यांनी भुसावळ डी आर एम श्री केडिया यांच्याशी चर्चा करून सदर काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले व पाचोरा येथील सामान ऊचलन्याचे काम बंद झाले श्री खासदार यांनी सांगितले येत्या काही दिवसात दिल्ली येथे रेल्वे बोर्ड चैरमन व जनरल मॅनेजर तसेच रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत पि जे बचाव कृती समिती पाचोरा यांची संयुक्त बैठक लवकरच घेणार आहे असे पत्र संबंधित व्यक्तींना देण्यात आले आहे असे श्री खासदार यांनी सांगितले पि जे रेल्वे स्टेशनवर यावेळी पि जे बचाव कृती समिती अध्यक्ष खलील देशमुख कार्याध्यक्ष अँड अविनाश भालेराव खजिनदार पप्पू राजपूत प्राध्यापक मनिष बाविस्कर भरत खंडेलवाल सुनील शिंदे संजय जडे आबा येवले प्राध्यापक गणेश पाटील रणजीत पाटील राजू पाटील आदी बचाव कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते