वडिलांच्या मृत्यू नंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणाचे डॉ. सप्निल पाटील यांनी वाचविले प्राण

वडिलांच्या मृत्यू नंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणाचे डॉ. सप्निल पाटील यांनी वाचविले प्राण

पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर स्वप्नील पाटील देवदूत म्हणून आले समोर

नगरदेवळा ता.पाचोरा :
रोजंदारी करून घरी परतत असताना अचानक आज दिनांक ३१ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास नगरदेवळा येथील इसमाचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना शिंदोळ रस्त्यावर घडली होती, सैय्यद सबदर सैयद इस्माईल यांचा त्यांच्या मुला देखतच मृत्यू झाला तर मुलालाही मधमाशांनी चावा घेतल्याने मृत्यशी झुंज देणाऱ्या त्यांच्या मुलास आबिद सैय्यद सबदर वय वर्ष २६ यास उपचारासाठी पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते, योग्य वेळी योग्य उपचार होत असल्याने सद्या त्याची परिस्थितीत सुधारणा असल्याचे सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल पाचोरा चे संचालक डॉक्टर सप्नील पाटील यांनी सांगितले,

अशा परिस्थितीत देवदूत म्हणून समोर येणाऱ्या मुलाचे प्राण वाचवणाऱ्या सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर स्वप्नील पाटील यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे,