बंजारा समाजाचं मूळ सनातन हिंदू धर्मातच आहे – पू . मुरारी बापू

बंजारा समाजाचं मूळ सनातन हिंदू धर्मातच आहे – पू . मुरारी बापू

जामनेर, २७ जानेवारी

अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभाच्या तिसर्या दिवशी धर्मसभेत बंजारा सामाज मूळ सनातनी हिंदू समाज असल्याचे विधान पू. मुरारी बापू यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर पूज्य मुरारी बापू , पूज्य रामप्रसादजी , वेदशास्त्री साहेबराव शास्त्री , पू संग्रामसिंह महाराज , श्री धनसिंग नायक ( तेलंगाणा ) , पू . सिद्धलिंगजी महाराज , पू. बाबूसिंगजी महाराज , पूज्य शाम चैतन्य महाराज , स्वामी अभयानंदजी महाराज , स्वामी प्रणवानंदजी महाराज , पू गोपाल चैतन्यजी महाराज ,पू . रघुमुनुजी महाराज उपस्थित होते.

यावेळी वेदशास्त्री साहेबराव शास्त्री यांनी मार्गदर्शन करतांना वैदिक सनातन धर्म अनादि आहे , गोर बंजारा हिंदू धर्माची प्रमुख शाखा आहे. गो रक्षक , गो सेवक आणि गो पालन करणारे गोर बंजारा आहेत. शास्त्रातील युद्धवीर , दयावीर , धर्मवीर आणि दानवीर हे सार्वजन गोरबंजारा समाजत आहेत. संत हे धर्मवीर आहेत. विचारांचे धन घेण्यासाठी हा कुंभ आहे. विचारांनी परिवर्तन होते. सनातन धर्म हा उपासना आणि आचरणाचा धर्म आहे. ” हम हिंदू थे , हिंदू हे और हिंदूही रहेंगे ” त्यांनी असे सांगितले . पू. संग्रामसिंग महाराज यांनी धर्म सर्व व्यापी आहे. बंजारा म्हणजे सनातन हिंदू असे सांगितले. तर थानसिंग यांनी ” कट गये हिंदू धर्म बचा ने के लिए ” . आज धर्म तुटतो आहे. धर्म सोडू नका असे सांगितले.

बाबूसिंग महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात समाज जाग्रुत करण्यासाठी कुंभ आहे. वशिष्ठ मुनींशी आपले नातं पुरातन आहे. रामजन्मभूमीवर भव्यदिव्य कार्यक्रम होणार आहे . १४ कोटी बंजारा एकजूट व्हा. गोरबंजारा हे हिंदूच आहेत. सिद्धलिंग महाराज कर्नाटक यांनीही यावेळी मार्गदर्श केले.

स्वामी प्रणवानंदजी यांनी आपल्या मार्गदर्शनात गोद्रीतील कुंभ हा हिंदू गोर बंजारा समाजाचा कुंभ आहे. जाती अनेक पण धर्म एकच आहे. सनातन हिंदू धर्माची सर्व लक्षणे धर्मात असतात ते जातीत नसतात. १४०० वर्षांपूर्वी इस्लाम आला , २००० वर्षांपूर्वी इसाई धर्म आला परंतु हे दोन्ही धर्म सनातन नाहीत. ” हमी क्षत्रिय है , हम रघुवंशी हे ” जातीत पडून आपण धर्माची संवेदना विसरतो. आपण गीता वाचली पाहिजे , हनुमान चालीसा वाचली पाहिजे , धर्म ग्रंथ वाचा जीवनात धर्माचे आचरण करा. हजारो वर्षापासून तुम्ही हिंदू आहेत. बंजारा समाज हिंदू धर्माचा अविभाज्य अंग आहे. जातीवाद धर्माला कमजोर करतो . आपले पूर्वज धर्माच्या रक्षणासाठी लढले. भारतात इसाईकारण होत आहे. गावागावात चर्च बनत आहेत. सावध झाले नाही तर एक एक जात इसाई खाऊन जातील असे ते म्हणाले.

 

धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगाना राज्यातही त्वरित लागू व्हावे – धर्मसभेत प्रस्ताव पारित

संत शाम चैतन्य महाराज यांनी धर्मसभेत दुसरा प्रस्ताव ठेवला. त्यात स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षात ख्रिश्चनांची संख्या १० पट वाढली आहे. त्यास धर्मांतरण हेच कारण आहे. बंजारा समाज प्राचीन काळापासून सनातन , हिंदू समाज रक्षक आहे. ख्रिस्ती धर्मांतराच्या द्रुष्ट चक्राचा हा समाज शिकार होत आहे. ५ राज्यातील ११ हजार तांड्यापैकी ३५०० तांड्यामध्ये चर्च दिसत आहेत. कर्नाटक आणि मध्यप्रदेश सरकारद्वारे धर्मांतर विरोधी कायदा लागू कारण्यात आले आहे. असे कायदे महाराष्ट्र , आंध्र प्रदेश , तेलंगणा राज्यात त्वरित लागू करावेत आदी विषय या प्रस्तावात आहे. सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

रघुमुनी महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात समाज जोडण्या साठी हा कुंभ आहे. बंजारा समाज हिंदू आणि सनातन होते व राहतील . तुम्ही महादेवाचे वंशज आहेत असे सांगितले.

पू. मुरारी बापू यांनी आपल्या उपदेशात सनातन मूल्यांना पकडून ठेवावे . सनातन धर्माची सेवा करा . सनातन धर्म हा नष्ट होंणारा धर्म नाही, ज्या प्रमाणे आपण घर सोडून बाहेर घेल्यावर धूळ होते त्याच प्रमाणे वेद , गीता ,उपनिषद ,गुरुग्रंथ साहेब सारख्या ग्रंथापासून दूर गेल्यामुळे हिंदू सामाजाचे धर्मांतरण वाढते. बंजारा हे हिंदूच असून २०२४ ला रामकथा करण्याची वेळ त्यांनी दिली आहे. ” राम चा आदर्श घेऊन आपण जग जोडू शकतो .” प्रलोभन आणि लालच पासून दूर राहून आपण आपल्या सनातन धर्माचे आचरण करावे.असे सांगितले. बंजारा सामाज मूळ प्रवाहाचा सनातनी समाज असल्याचे सांगतले