शहरासह तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांनी मनमानी कारभार थांबवावा: रयत सेने ची मागणी

शहरासह तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांनी मनमानी कारभार थांबवावा

*रयत सेनेचे तहसिलदारांना निवेदन…

पाचोरा शहरासह तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांचा सुरू असलेला मनमानी कारभार थांबवावा या मागणीसाठी रयत सेनेतर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. काही रेशनिंग दुकानदार हे ग्राहकांना थंब मशिनद्वारे येणारे बिल देत नाहीत. तसेच अनेक रेशनिंग दुकानदारांनी आपल्या रेशनिंग दुकाना समोर धान्य उपलब्धतेचे फलक ही लावलेले दिसुन येत नाही. यासारख्या अनेक तक्रारी ग्रामस्थांकडुन येत असल्याने रयत सेनेतर्फे पाचोरा तहसिलदारांना निवेदन दिले आहे. यावेळी रयत सेनेचे तालुका अध्यक्ष रमाकांत पवार, शहर अध्यक्ष रामा जठार, शहर उपाध्यक्ष साहेबराव तडवी, सचिव चंद्रकांत दत्तु, समन्वयक इरफान शेख मणियार, प्रसिध्दी प्रमुख विनायक मोरे, डॉ. दिनेश जगताप, वैभव इंगळे, दिपक मोरे उपस्थित होते. तहसिलदार यांचे तर्फे नायब तहसिलदार संभाजी पाटील यांनी निवेदन स्विकारले.