जीवनात संघर्ष केला तरच यश मिळते पोलीस निरीक्षक अजित सावळे

जीवनात संघर्ष केला तरच यश मिळते पोलीस निरीक्षक अजित सावळे

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात आज दि.०१ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित ‘वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सावळे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे कार्यकारी मंडळ सदस्य सुरेश सिताराम पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा गव्हर्निंग कॉन्सिलचे सदस्य जयवंत जगन्नाथ पाटील, गव्हर्निंग कॉन्सिलचे सदस्य यशवंत दोधु खैरनार, गव्हर्निंग कॉन्सिल सदस्य डॉ.अशोक पंडितराव कदम तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य बी.एस.हळपे, पर्यवेक्षक एस.पी.पाटील तसेच स्नेहसंमेलन प्रमुख डी.पी.सपकाळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.ए.बी.सूर्यवंशी यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वार्षिक स्नेहसंमेलन उपप्रमुख एस.पी.पाटील यांनी केले.याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक अजित सावळे यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी शिस्त पाळून जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. जीवनात संघर्ष केला तरच यश मिळते.स्पर्धेत टिकण्यासाठी संघर्ष,जिद्द तसेच प्रचंड कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून संकटाचा सामना करावा. प्रेम व त्या प्रेमातील पावित्र्य टिकविले तरच नाते टिकते हे आजच्या तरुणाईने लक्षात घ्यायला हवे’.याप्रसंगी त्यांनी महाविद्यालयाने व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीचे कौतुक केले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘ विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा विकास करण्यासाठी नियमितपणे प्रयत्नशील राहिले पाहिजे.अभ्यास, जिद्द, संघर्ष यांची कास धरली तरच जीवन सुखकर होईल’.
याप्रसंगी मेहंदी, रांगोळी, पाककला, आनंद मेळावा, रांगोळी, विविध खेळ व नाटिका, पथनाट्य, एकल नृत्य, समूह नृत्य, आदिवासी नृत्य, कॉमेडी शो,सुगम गायन, समूह गायन, गीत गायन, शेला पागोटे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी स्पर्धांचे पारितोषिक वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यात नाटिका या कला प्रकारात गणेश देविदास कोळी-प्रथम, एन.एस.एस. ग्रुप- द्वितीय व रिया भगवान पाटील- तृतीय, गीत गायन एकल या कला प्रकारात तेजल गोपाल पाटील-प्रथम व सलोनी पटाईत उत्तेजनार्थ, समूह नृत्य कला प्रकारात प्रमिला धनसिंग पावरा-प्रथम, मानसी पाटील व वंश-द्वितीय, पावरा सपना वजीर- तृतीय व मानसी श्रीहरी पाटील-उत्तेजनार्थ, एकल नृत्य कला प्रकारात पावरा संदीप तितऱ्या- प्रथम, कुलविंदर अशोक पाटील-द्वितीय, गोहिल सोनल-तृतीय व वैभवी पाटील- उत्तेजनार्थ, मेहंदी स्पर्धेत निकिता अभिजीत पाटील-प्रथम, कल्याणी शंकर तांबट-द्वितीय व मयुरी रवींद्र पाटील-तृतीय, रांगोळी स्पर्धेत जानवी कांतीलाल गुजर-प्रथम, रिया विकास मगरे-द्वितीय, प्रीती विलास तुळसकर-तृतीय तर रितू रमेश चौधरी-उत्तेजनार्थ, आनंद मेळावा या स्पर्धेत फाइव स्टार स्टॉल-प्रथम, अटेंशन स्टॉल- द्वितीय, चॅम्पियन पावर लिफ्टिंग जिमखाना- तृतीय. यात स्टॉप कर्मचारी पूजा पून्नासे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. पाककला स्पर्धेत ज्यूस प्रकारात जमील राजा-प्रथम, पोषक आहार प्रकारात वैष्णवी महेश पाटील-प्रथम व शुभांगी राजेंद्र पाटील-द्वितीय, नाश्ता प्रकारात मोहिनी कैलास पाटील-प्रथम, हर्षदा कैलास बिर्ला-द्वितीय, दिपाली नितीन ठाकरे- तृतीय व स्टाफ कर्मचारी दिपाली संतोष पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शेला शेलापागोटे स्पर्धेत रोहन ज्ञानेश्वर जाधव-प्रथम, अश्विनी रवींद्र पाटील-द्वितीय व भूगोल विभाग सर्व शिक्षक-तृतीय याप्रमाणे विजेत्यांनी पारितोषिके प्राप्त केली.
यात यावेळी क्रिकेट स्पर्धेत विजेत्या सिनीअर महाविद्यालयाचे कॅप्टन डॉ. कुणाल गायकवाड व संघास तसेच उपविजेत्या संघाचे कॅप्टन व्ही एम पाटील व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या संघास तसेच सिनीअर महाविद्यालयीन संघातील प्रतीक पाटील यांना ‘मॅन ऑफ दी मॅच’ म्हणून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी सहकार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप भास्कर पाटील व डॉ.एम.एल.भुसारे यांनी केले तर आभार स्नेहसंमेलन प्रमुख डी.पी.सपकाळे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समिती प्रमुख, सदस्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.