कला व विज्ञान महाविद्यालयात तुषार पाटील,याचा सत्कार

_कला व विज्ञान महाविद्यालयात तुषार पाटील,याचा सत्कार…!!!_

कोळगाव (भडगाव)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव येथील तुषार राजेंद्र पाटील (एस.वाय.बी.एस.सी) या विद्यार्थ्याने सेमिनार हॉल,झेड.बी.पाटील,महाविद्यालय, धुळे, येथे पार पडलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्याचा गौरव प्राचार्य सुनिल पाटील,प्रभारी प्राचार्य संदीप बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आला,यावेळी प्रा.नरेंद्र भोसले,प्रा.मनोज पाटील,प्रा.प्रविणा पाटील,प्रा.प्रेमचंद चौधरी,प्रा.दत्तात्रय भोसले,प्रा.तुषार पाटील,चेतन पाटील आदि उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,उपसचिव प्रशांतराव पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी तुषारचे कौतुक करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.