जेष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने सौ वंदना विनोद बरडे सह. अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांचे मोलाचे मार्गदर्शन व अवयव दानाची शपथ

जेष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने सौ वंदना विनोद बरडे सह. अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांचे मोलाचे मार्गदर्शन व अवयव दानाची शपथ

 

दिनांक १आक्टोबर २०२३ ला रविवारी कटारिया सभागृहामध्ये जेष्ठ नागरिक दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम जेष्ठ नागरिक संघाचे वतीने घेण्यात आला.ऊपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून रक्त तपासणी, ब्लडप्रेशर,आभा कार्ड, ह्या सेवा देण्यात आल्या.व्हिल चेअर सेवा देण्यात आली.
यावेळी मंचावर श्री वि.गो.सोनेकर अध्यक्ष,सौ मीरा वानखेडे,मा.कि.मगरे,छोटूभाऊ,सौ स्मिता सोनेकर,सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर उपस्थित मान्यवर होते.
सौ वंदना विनोद बरडे सह. अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी सुंदर आरोग्यदायी जीवनाची सकारात्मक शपथ दिली.त्यांनी आपल्या मार्गदर्शानाची सुरवात गूरुवंदनाने कैली.त्यांनी सर्व जेष्ठ नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.आपले आरोग्य चांगले राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली.त्यानी आपल्या मार्गदर्शनात आरोग्यदायी जीवनशैली विषयी माहिती दिली. अवयव दानाची माहीती दिली.अवयव दिनाविषयी गैरसमज दूर केले. अवयव दानाचा प्रचार व प्रसार करण्यांत आला.आणी अवयव दान,रक्त दान, नेत्र दान इतर अवयव दान करण्याचें आव्हान करण्यात आले.अवयव दान फार्म भरण्याची प्रक्रिया समजावून सांगितले.हे वर्ष त्रुनधान्य वर्षं, भरड धान्य वर्ष आहे त्याचा अवलंब करावा हे समजावून सांगितले.शेवटी जेष्ठ नागरिक संघाचे खूप कौतुक केले.आणी जेष्ठ नागरिकांना मान सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे.याचे आव्हान केले.आणी अवयव दानाची शपथ सर्वांना दिली.आणी वेळेला गुरू मानुन चालावे.
जगी जीवनाचे सार ,जाणुनी घ्यावे सत्वर,जगी ज्याचे जैसे कर्म,फळ देई तोहे ईश्वर “