श्री सु.भा.पाटील प्रा.वि. मंदिर येथे हाथी घोड़ा पालकी,जय कन्हैयालाल की… आला रे आला,गोविंदा आला या जयघोषात दही हंडी साजरी

🧉🎈दहीहंडी उत्सव🎈🧉

हाथी घोड़ा पालकी,जय कन्हैयालाल की…
आला रे आला,गोविंदा आला….
या जयघोषात आज👇

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु.भा.पाटील प्रा.वि. मंदिर(दुपार सत्र) येथे आज इयत्ता.३ री- ४थी च्या विद्यार्थ्यांचा दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर यांच्या हस्ते दहीहंडी चे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी मुलांची व मुलींची अशा दोन दहीहंड्या सजवण्यात आल्या. मुलींचे आणि मुलांचे क्रमाने तीन थर लावून वेगवेगळ्या दहीहंड्या फोडण्यात आल्या.   शिक्षक,विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रास/ दांडिया कार्यक्रम अतिशय जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  यांचे सहकार्य लाभले.

🎈🧉🎈🧉🎈🧉🎈🧉🎈🧉