नांद्रा येथे रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटप

नांद्रा येथे रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटप

नांद्रा(ता.पाचोरा)ता.23येथील रेशन दुकानात आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आले.गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने बाळासाहेबाची शिवसेना व भाजप सरकारने यंदा रेशन दुकानात गहू, तांदूळ बरोबर शंभर रुपयांत आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात येते आहे.त्यात प्रत्येकी एक किलो साखर,तेल, चणाडाळ,रवा चे वाटप करण्यात आले.आज येथील रेशन दुकानात सेल्समन भिका पाटील यांनी रेगूलर धान्य वाटपात बरोबर लाभार्थींना आनंदाचा शिधाचे वाटप केले.आनंदाचा शिधा घेतलेल्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.लाभार्थींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सह आमदार किशोर पाटील यांचे आभार मानले. या प्रसंगी सुभाष पाटील, सखाराम पाटील, सुनील तावडे, किशोर पाटील, पत्रकार राजेंद्र पाटील,सुपडू न्हावी, राकेश साळवे यांच्या सह लाभार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कोट.
दिवाळीत पहिल्यांदाच रेशन दुकानात आम्हाला साखर, तेल, रवा, चणाडाळ मिळाली या गोष्टीचा मला फारच आनंद झाला या बद्दल शासनाचे आभार व्यक्त करतो.
बंन्शीलाल जाधव अंत्योदय लाभार्थी