सोयगाव : छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ व क्रीडा भारतीतर्फे कबड्डी स्पर्धेचा शानदार शुभारंभ; १६ संघांचा सहभाग
सोयगाव प्रतिनिधी —दत्तात्रय काटोले
छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव येथील प्रदीप चित्र मंदिर मैदानावर ६० किलो आतील वजनी गटातील कबड्डी स्पर्धेचा शनिवारी सायंकाळी दिमाखदार शुभारंभ झाला. या स्पर्धा प्रथमच मॅटवर आयोजित करण्यात आल्या असून एकूण १६ संघांनी सहभाग नोंदविला आहे.
स्पर्धेचा शुभारंभ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरपाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ, सोयगाव व पाचोरा येथील क्रीडा मंडळ यांच्यात शो मॅच खेळविण्यात आली, ज्याने उपस्थित प्रेक्षकांचा उत्साह वाढविला.
कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरपाळे, सोपान गव्हांडे, संजय शहापूरकर, प्रशिक्षक आबा पवार, रतन फुसे, भरत पगारे, करीम देशमुख, ज्ञानेश्वर वाडेकर, अली पठाण, भगवान रोकडे, हर्षल काळे, गोविंदा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप चौधरी, कृष्णा जूनघरे, विष्णू खाकरे, दीपक चौधरी, शेख दिलीप, वसंत बनकर, राजेंद्र जावळे, दिलीप पायघन, अविनाश पाटील, विष्णू दुसाने, प्रकाश बोर्डे, आनंदा इंगळे, दत्तु पोटदुखे, नथ्थु चौधरी, नाना वामने, दत्तु देशमुख, प्रमोद पाटील, श्रीकांत बोरसे, विजय पगारे, मंगेश सोहनी, दत्तात्रय काटोले, सुनील पाटील, अविराज रोकडे, योगेश हजारी, कमलेश काळे, डॉ. सुशील जावळे, डॉ. निलेश गाडेकर, डॉ. निलेश गावडे, डॉ. साईराज तडवी, विश्वेश चौधरी, संजय जावळे, शोभराज चौधरी, विजय गव्हांडे, उदय रावळकर, अक्षय औरंगे, अली शेख (डिलिव्हरी पार्सल), ऋतिक चौधरी, निखिल चौधरी, अनिल रोकडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
























