पाचोऱ्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तर्फे दीक्षांत समारोहाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न 

पाचोऱ्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तर्फे दीक्षांत समारोहाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

पाचोरा ( प्रतिनिधी संदीप तांबे )

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा येथे आज दिनांक १७/९/२०२२ रोजी दीक्षांत समारोहाचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नायब तहसीलदार श्री सोनार साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस प्रशासनाकडून माननीय श्री डी वाय एस पी भारत काकडे साहेब व संस्थेचे गटनिर्देशक श्री विलासजी भोळेसर (प्रभारी प्राचार्य )यांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विशेष प्राविण्यसह पास गुणवंत प्रशिक्षणार्थींना व्यावसायिक पदविका (आय.टी.आय पास प्रमाणपत्र) याचे वाटप करण्यात करण्यात आले सदर प्रसंगी माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब व प्रमुख पाहुण्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले याप्रसंगी  कार्यक्रमास उपस्थित संस्थेचे निर्देशक वर्ग श्री एल आर पाटील सर, पगारे मॅडम, पाटील मॅडम, वैभव काळे सर ,मनोज पाटील सर, मोहनीश भावसार सर , वैभव देशमुख सर, चेतन पाटील सर, चेतन महाजन सर व चतुर्थ श्रेणी कर्मचारी चावरे दादा, भटजी दादा, मोरे ताई या सर्वांनी परिश्रम घेत कार्यक्रम पूर्णत्वास केले सूत्रसंचालन मोहनीश भावसार व आभार प्रदर्शन देशमुख सर यांनी केले.