विश्व मानव रुहानी केंद्र नवा नगर शाखा पाचोरा जि, जळगाव अपंग बांधव साठी आले धाउन

पाचोरा प्रतिनिधि आज दि, 18,7,2022 सोमवार रोजी
विश्व मानव रुहानी केंद्र नवा नगर शाखा पाचोरा जि, जळगाव अपंग बांधव साठी आले धाउन
पाचोरा येथे विश्व मानव रूहानी केंद्र नवानगर शाखा पाचोरा यांच्या मार्फ़त एका गरीब व गरजू अपंग श्री अर्जुन दामू सोनार रा, संभाजी नगर पाचोरा येथील रहिवासी यांना, 3 चाकी सायकल मोफत प्रदान करण्यात आली । ग्रामीण हॉस्पिटल पाचोरा चे वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंखे यांनी या रुग्णाची दखल घेऊन मागणी केली असता पावसाचे दिवस असल्या कारणाने त्यांना लघुशंखेसाठी कुठे ही एन्या जाण्यासाठी जाता येत नव्हते त्यांना खुप त्रास होता , विश्व मानव रुहानी केंद्र पाचोरा चे सेवेदार त्याच्या मदतीला धाऊन आले ही माहिती विश्व मानव रूहानी सत्संग मंडळचे शेवेकरी यांना कळाली त्यांनी कुठलाही विचार न करता आपसात सायकल एवढी रक्कम जमा करून त्या अपंग अर्जुन सोनार यांना सायकल घेऊन त्याच्या स्वाधीन केली या प्रसंगी डॉ बापू सोनवणे,श्री कैलास पाटील, श्री राजाभाऊ पाटील, श्री राम पाटील,श्री यशवन्त मिस्तरी, श्री गोकुळ कुसुबे ,श्री अनिल पाटील, श्री संजय शेवाळे, श्री भीमराव पाटील ,श्री शरद खैरनार यांनी सहकार्य केले